International Traitor Day: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह गद्दारीला उत्तेजन देतात- संजय राऊत (Watch Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) युनायटेड स्टेट्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेव्हा त्यांनी या दौऱ्यातही युनोकडे मागणी करावी की, 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा.
Sanjay Raut Appeal PM Narendra Modi: शिवसेना (UBT) म्हणजेच उद्धव ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray Faction) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजब मागणी करुन पुन्हा एकदा धमाल उडवून दिली आहे. संजय राऊत यांनी चक्क युनोलाच पत्र लिहून 20 जून हा 'जागतिक गद्दार दिन' (International Traitor Day) म्हणून घोषीत करावा असे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना संजय राऊत यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) युनायटेड स्टेट्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेव्हा त्यांनी या दौऱ्यातही युनोकडे मागणी करावी की, 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री गद्दारीला उत्तेजन देत असल्याचेही राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, आमचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्र सरकार गद्दारीला प्रोत्साहन देत आहेत. 20 जून या दिवशी आमच्या 40 आमदारांनी पक्ष सोडला. तो दिवस 'आंतरराष्ट्रीय देशद्रोही दिन' म्हणून घोषित करावा. पंतप्रधान अमेरिकेला जाणार आहेत, त्यामुळे त्यांनी याबाबत संयुक्त राष्ट्रांना सांगावे आणि 'आंतरराष्ट्रीय देशद्रोही दिन' जाहीर करावा.
ट्विट
दरम्यान, शिवसेना (UBT) म्हणजेच उद्धव ठाकरे गट आज जागतिक गद्दार दिन साजरा करणार आहे. मात्र, अशा प्रकारचा दिवस साजरा करु नये यासाठी मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या पादाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्याचे वृत्त आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसुद्धा आज 'खोके दिन' साजरा करणार असल्याचे समजते. मुंबई पोलिसांनी असा कोणत्याही प्रकारचा दिन साजरा करु नये असे अवाहन केले आहे.
ट्विट
मुंबई पोलिसांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणू नये असा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर एका वर्षानंतर दोन्ही पक्ष आजचा दिवस "आंतरराष्ट्रीय देशद्रोही दिन" म्हणून पाळणार आहेत.