2020 मध्ये पुन्हा होणार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक? काँग्रेस नेते संजय निरुपम यांची भविष्यवाणी

शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP + Congress) काँग्रेसची आघाडी ने एकत्रित येऊन सरकार स्थापन केले तरी ते फार काळ टिकणार नाही आणि परिणामी 2020 मध्ये पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे अशी भविष्यवाणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केली आहे.

संजय निरुपम (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhansabha Elections) आटोपून आता 18 दिवस झाले असले तरी अजूनही राजकीय सत्तासंघर्ष मात्र कायम आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा दावेदारावरून सुरु असणाऱ्या या वादाचं आज दिवसाखेरीस अंतिम निर्णय लागण्याची शक्यता आहे. मात्र एवढया वादांनंतर जरी महा शिव आघाडी म्हणजेच शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP + Congress) काँग्रेसची आघाडी ने एकत्रित येऊन सरकार स्थापन केले तरी ते फार काळ टिकणार नाही आणि परिणामी 2020 मध्ये पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे अशी भविष्यवाणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam)  यांनी केली आहे. सोबतच जर का 2020 मध्ये पुन्हा निवडणूक झाली तर शिवसेनेसोबत निवडणूक लढवण्यास काँग्रेस तयार आहे का? असा सवालही निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यांना केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आता शिवसेना आणि काँग्रेस महाआघाडीच्या हातमिळवणीवर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे, काही वेळेपूर्वीच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात एक खास बैठक झाली असून 4 वाजता महाआघाडीच्या कोअर कमिटीची एक बैठक घेऊन त्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर अंतिम निर्णय दिला जाणार आहे. तत्पूर्वी संजय निरुपम यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून काँग्रेस पक्ष हा सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या बाजूने जाण्यास अजूनही तयार नाही असे संकेत मिळत आहेत.

संजय निरुपम ट्विट

शिवसेनेचे डोळे घड्याळाकडे; पाठिंब्याच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडी 4.30 वाजता देणार अंतिम निर्णय

दरम्यान, आज संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत राजभवनावर शिवसेनेला बहुमताचा आकडा सिद्ध करायचा आहे अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. माध्यमांच्या माहितीनुसार शिवसेना 5 वाजता राजभवनावर राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहे.