अजोय मेहता मुख्यमत्र्यांचे प्रधान सल्लागार तर, संजय कुमार यांची मुख्य सचिव पदावर नियुक्ती

यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर, संजय कुमार (Sanjay Kumar) यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मंत्रालय (Photo Credits : Facebook)

सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता (Ajoy Mehta) हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर, संजय कुमार (Sanjay Kumar) यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे.

1984 च्या बॅच चे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविड च्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील. संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. हे देखील वाचा- शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सुनील तटकरे यांचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्वीट- 

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. सध्या अंतिम वर्षातील निवासी डॉक्टर कोरोना विरोधात महत्वाची भूमिका बजावत आहेत. यामुळे  मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला एमडी/ एमएस परीक्षा डिसेंबर 2020 पर्यंत तहकूब करा, अशी विनंती त्यांनी केली आहे.