Whirlwind Accident Sangola: 'वावटळ' वाऱ्यात पालासकट उडाली झोळी; दीड वर्षांच्या चिमूकलीचा मृत्यू; सांगोले तालुक्यातील घटना
वावटळ वाऱ्यामुळे दीड वर्षाच्या चिमुलीचा मृत्यू झाला आहे. कस्तुरा साधू चव्हाण (रा. सोनंद ता. सांगोला) असे मृत मुलीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, कस्तुरा चव्हाण हिच्या वडिलांचे पाल लेंडी ओढ्यात होते.
Sangola News: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोल तालुक्यात असलेल्या लेंडी ओढा येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वावटळ वाऱ्यामुळे दीड वर्षाच्या चिमुलीचा मृत्यू झाला आहे. कस्तुरा साधू चव्हाण (रा. सोनंद ता. सांगोला) असे मृत मुलीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, कस्तुरा चव्हाण हिच्या वडिलांचे पाल लेंडी ओढ्यात होते. या पालातल्या झोळीत कस्तुरा झोपली होती. वावटळ वारे पालात घुसले आणि पाल हवेत उंच उडाले. पालासोबत बाळाची झोळीही उडाली. ज्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजणेच्या सुमारास घडली. घडल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वावटळ आल्यास हवेचा भोवरा होऊन हलक्या वस्तू आकाशात उडतात. नागरिकांचे कपडे, शेतमाल झाकायचे मोठे तळवट किंवा कागद, ताडपत्री, घराचे पत्रे हवेत उडतात. पण, शक्यतो पाल उडत नाही. कारण पाल जमीनीत खुंट्या ठोकून घट्ट बांधलेले असते. तरीसुद्धा पाल हवेत उंच कसे उडाले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिसरात घडलेली ही अत्यंत दुर्मिळ आणि अपवादात्मक घटना मानले जात आहे. (हेही वाचा, Shahajibapu Patil: डोंगर..झाडी फेम आमदार शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले, आमदार निवासातील खोलीचे छत कोसळले)
दरम्यान, चिमूकलीचा असा पद्धतीने करुन अंत झाल्याचे कळताच माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक साळुंके यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. चिमुकलीचा अशा प्रकारे झालेला करुण अंत पाहून आई वडील आणि चिमुकलीच्या आजोबांना टाहो आवरता आला नाही.
अधिक माहिती अशी की, मृत चिमुकलीचे वडील साधू अण्णा चव्हाण हे मुुळचे सोनंद येथील रहिवासीआहेत. मुलगी कस्तुरा हिच्या वैद्यकीय तपासणीसाठी ते गुरुवारी सकाळी सांगोले येथील जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. दरम्यान, उन्हाचा तडाखा वाढल्याने त्यांनी पती-पत्नी आणि आजोबा रमेश भीमा निंबाळकर यांच्या जवळा घेरडी रस्त्यावरील लेंडी ओढ्याच्या पात्राकडेला टाकलेल्या पालावर विश्रांती घेतली. इथे त्यांनी विश्रांती घेतली. दरम्यान, बाळाला पालातील झोळीत झोपवले. नेमके त्याच वेळी पालात वावटळ घुसले आणि पाल उडाले. सोबत झोळीही उडाली. यात मुलीचा मृत्यू झाला.