Death Due To DJ: सांगलीत डॉल्बीच्या दणदणाटीमुळे आणखी एक मृत्यू? रस्त्यावर सापडला अज्ञात मृतदेह

सांगली पुन्हा विसर्जन मिरवणुकीत आणखी एकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Death Due To DJ: महाराष्ट्रातील सांगलीत डॉल्बीच्या दणदणाटामुळे दोन दिवसांपुर्वी दोन तरुणांचा आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. काल सांगली पुन्हा विसर्जन मिरवणुकीत आणखी एकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे ओळख अद्यापही स्पष्ट झाले नाही. मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण देखील अस्पष्ट आहे. परंतु या व्यक्तीचा ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सांगलीतील मिरज येथील गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान संशयास्पद मृतदेह सापडला. डीजेच्या दणदणाटामुळे मिरवणूकीत याचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. डॉल्बीच्या दणदणाटामध्येच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मिरज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पोलीसांकडून तपास सुरु केला. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.  या आधी दोन तरुणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील हिंजवडी येथे दोन दिवसांपुर्वी डॉल्बीच्या दणदणाटीमुळे ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. डीजेच्या दणदणाटीमुळे ह्रदयविकारात झटका येतो त्यामुळे तरुणांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे असं तज्ज्ञांनी अहवाल सादर केला आहे.