Shivshahi Bus Molestation in Sangli: शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग; सांगली येथील घटना; संशयितास अटक
सांगली येथे शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणात वैभव कांबळे नामक तरुणास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एमएसआरटीसी (MSRTC) द्वारे चालविण्यात येणारी शिवशाही बस (Shivshahi Bus) सध्या वाद आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याच बसमध्ये पुणे येथील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना पुढे आली. त्यावरुन समाजामध्ये तीव्र संतपा आहे. त्यातच आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. सांगली (Sangli) येथे शिवशाही बसमध्ये एका तरुणीचा विनयभंग (Molestation) झाल्याची तक्रार आहे. एका तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, वैभव कांबळे नामक तरुणास पोलीस आणि नागरिकांनी पकडून पोलीस स्टेशनला नेले आहे. दरम्यान, सदर व्यक्तीस नागरिकांनी मारहाण केल्याचे समजते.
रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा
मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका गावची रहिवासी असलेली 24 वर्षीय तरुणी नोकरी/व्यवसाय निमित्त पुणे येथे वास्तव्यास आहे. काही कारणांनी ती तिच्या मूळ गावी निघाली होती. त्यासाठी तिने स्वारगेट बस स्थानकावरुन शिवशाही बस घेतली. रात्रीच्या सुमारास ही बस इस्लापपूर बस स्थानकात आली असता एक संशयित व्यक्ती बसमध्ये चढला. त्याने बसण्यासाठी तरुणीच्या पाठीमागचे आसन निवडले. बस सुरु झाली. दरम्यान, बस आष्ठा मार्गे सांगलीला येत असताना रात्री 11.00 वाजणेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन या व्यक्तीने तरुणीस खिडकीकडील बाजूने अश्लील स्पर्ष करण्यास सुरु केले. (हेही वाचा, Swargate Bus Rape Case: स्वारगेट येथील शिवशाही बलात्कार प्रकरण; आतापर्यंतचा घटनाक्रम आणि ठळक घडामोडी)
संशयित आरोपीस नागरिकांकडून चोप
तरुणीने सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र त्याने तिला अधिकच त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुणीने या घटनेची माहिती वाहकास दिली आणि बस स्टँडला येताच जोराचा आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर स्डँडवर उपस्थित इतर नागरिक आणि प्रवाशांनी घटनेची दखल घेतली. दरम्यान, अंधार आणि गोंधळाचा फायदा घेत हा व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, प्रवाशांनी त्यास पकडले आणि मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेत त्यावर कायदेशीर कारवाई सुरु केली. चौकशीदरम्यान, सदर व्यक्तीचे नाव वैभव कांबळे असल्याचे पुढे आले. (हेही वाचा, Nanded School Sexual Assault: शालेय मुलावर लैंगिक अत्याचार, नांदेड येथील ज्ञानमाता विद्या विहार शाळेत सेवकाचे कृत्य)
स्वारगेट बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या आणि नादुरुस्त असल्याने सेवेत नसल्याने बाजूला उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. ही घटना घडल्यावर समाजातून तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. पोलीस प्रशासनास सूचना आदेश गेले आणि काही तास चालवलेल्या अथक तपास आणि शोध मोहिमेनंतर आरोपीस अटक करण्यात आली. तेव्हापासून शिवशाही बस वाद आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असतानाच सांगली येथील घटना पुढे आली आहे.
अन्याय अत्याचाराविरोधा माहिती आणि मदत
महिला आणि लहान मुले यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार यांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सेवा उपलब्ध असतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. स्वत:बद्दल किंवा पीडिताबद्दल माहिती देणे आणि मदत मिळविणे यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवा:
महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:
चाइल्डलाइन इंडिया: 1098; हरवलेली मुले आणि महिला: 1094; महिला हेल्पलाइन: 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग: 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन: 7827170170; महिला आणि ज्येष्ठ नागरिक पोलीस हेल्पलाइन: 1091/1291.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)