Sangli: नवऱ्यासोबत दुरावा, प्रियकराशी जवळीक; महिलेने संगनमताने घोटला पोटच्या मुलाचा गळा
विटा पोलिसांनी या प्रकरणी ज्योती प्रकाश लोंढे (वय 28 वर्षे, रा. लेंगरे) आणि रुपेश नामदेव घाडगे (वय 25 वर्षे, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) अशा दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील महिला पीडित मुलाची आई तर पुरुष हा महिलेचा प्रियकर आहे. महिलेने आगोदर मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव केला. मात्र, विहीरीत सापडलेल्या मृतदेहामुळे प्रकरणाचा भांडाफोड झाला.
नवऱ्यापासून दूर राहणाऱ्या आणि घटस्फोटाच्या मार्गावर असलेल्या महिलेने आपल्या प्रियकराच्या (Boyfriend) मदतीने पोटच्या मुलाचा गळा घोटला आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेल्या लेंगरे येथे हा प्रकार घडला आहे. विटा पोलिसांनी या प्रकरणी ज्योती प्रकाश लोंढे (वय 28 वर्षे, रा. लेंगरे) आणि रुपेश नामदेव घाडगे (वय 25 वर्षे, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) अशा दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील महिला पीडित मुलाची आई तर पुरुष हा महिलेचा प्रियकर आहे. महिलेने आगोदर मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव केला. मात्र, विहीरीत सापडलेल्या मृतदेहामुळे प्रकरणाचा भांडाफोड झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती प्रकाश लोंढे हिने प्रियकर रुपेश नामदेव घाडगे याच्याशी संधान साधून सहा वर्षाच्या बाळाला विहिरीत फेकले आणि त्याचे अपहरण झाल्याचा बनाव केला. दरम्यान, पोलिसांना लेंगे येथे एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि तपास सुरु केला. पोलीस तपासात पुढे आलेली माहिती अशी की, ज्योती लोंढे आणि रुपेश घाडगे यांचे पाठीमागील काही महिन्यांपासून विवाहबाह्य संबध आहेत. त्यातून ज्योती हिचे पतीसोबत अनेकदा संबधही ताणलेलेच होते. पती पत्नीमध्ये या संबंधाहून अनेकदा वादही होत. त्यातून दोघांनी घटस्फोटाचाही विचार केला होता. (हेही वाचा, Nanded Crime: नांदेडमध्ये पत्नीची बेदम मारहाण करुन केली हत्या, इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)
दरम्यान, आपल्यातील संबंधांना पतीपेक्षा आपल्या पोटच्या मुलाचा अडथळा होत असल्याचे ज्योती आणि तिच्या प्रियकराला वाटत होते. त्यातूनच तिने पोटचा मुलगा शौर्य याचा काटा काढण्याचा विचार केला. जो सहा वर्षांचा होता. त्यामुळे ज्योती हिने प्रियकर रुपेश घाडगे याला सोबत घेऊन शौर्य याचा काटा काढला. दोघांनी मिळून शौर्य याला विहिरीत फेकले आणि त्याच्या अपहरणाचा बनाव केला. तसेच, अपहरण झाल्याबद्दल फिर्यादही दिली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान, पोलिसांना एका चिमूकल्याचा मृतदेही विहिरीत तरंगताना आढळला. पोलिसांना संशय आल्याने दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. ज्यातून खरा गुन्हेगार पुढे आला.
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2023 02:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

