Sangli Lok Sabha Constituency: चंद्रहार पाटील यांचा दावा, काँग्रेसमध्ये धाकधूक; सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकासआघाडीत कोणाच्या वाट्याला?

दुसऱ्या बाजाला या पक्षाचे संभाव्य उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आपणच संभाव्य उमेदवार आहोत. स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला तसे आदेश दिल्याने सांगलीची जागा आपण लडणार, असे सांगितले आहे. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये धाकधूक वाढली आहे.

Uddhav Thackeray and Chandrahar Patil (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाविकासआघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. प्रामुख्याने ही रस्सीखेच शिवसेना (UBT) आणि काँग्रेस पक्षामध्ये अधिक आहे. आघाडीच्या नेत्यांनी अनेकदा दिलेल्या माहितीवरुन काही जागांचा अपवाद वगळता जागावाटप पूर्ण झाले आहे. मात्र, सांगली, रामटेक अशा काही मतदारसंघावरुन तिढा निर्माण झाला आहे. त्यातच सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) आम्हीच लढवणार असे शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख नेते उघडपणे सांगत आहेत. दुसऱ्या बाजाला या पक्षाचे संभाव्य उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी आपणच संभाव्य उमेदवार आहोत. स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला तसे आदेश दिल्याने सांगलीची जागा आपण लडणार, असे सांगितले आहे. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये धाकधूक वाढली आहे.

..अन काँग्रेसने जागा गमावली

वास्तविक पाहता सांगली हा काँग्रेस पक्षाचा परंपरागत मतदारसंघ. काही प्रमाणात याला बालेकिल्ला म्हणावा असा. काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्यापासून हा मतदारसंघ काँग्रेसचा राहिला आहे. लोकसभा निवडणूक 2014 आणि 2019 चा अपवाद वगळता त्यात खंड पडला आणि या ठिकाणी  संजय काका पाटील  यांच्या रुपात भाजप उमेदवार विजयी झाला. काँग्रेसने जागा गमावली. दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणूक 2019 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेस नेते विशाल पाटील हे स्वाभीमानी शेतकरी संघटेच्या तिकीटावर उभे राहिले होते. खरे तर विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू. सहाजिकच त्यांनी काँग्रेस तिकीटावर लढणे अपेक्षीत होते. मात्र त्या वेळच्या जागावाटपानुसार ही जागा मित्रपक्षाला गेली. परिणामी या ठिकाणाहून स्वाभीमानी शेतकरी संघटनेने उमेदवार उभा केला. (हेही वाचा, Sangli Loksabha Constituency: सांगली लोकसभा मतदारसंघ, पाटलांचा त्रिकोण; कोण जिंकणार मतदारांचे मन?)

उद्धव ठाकरे यांचा 'डबल केसरी'वर डाव

दरम्यान, शिवसेना (UBT) पक्षाकडे तसे पाहता तगडा उमेदवार नाही. पक्षाची मतदारसंघातील ताकदही मर्यादीत आहे. परंतू, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या रुपात त्यांना एक उमेदवार मिळाला आहे. शिवसेना (UBT) महाराष्ट्र केसरी पक्षावर डाव खेळू पाहात आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने या जागेवर जोरदार दावा सांगत ही जागा परंपरागत आमची आहे. इतकेच नव्हे तर केवळ सांगलीच नव्हे तर रामटेक हा देखील आमचाच मतदारसंघ असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून चूरस निर्माण झाली आहे.  (हेही वाचा, Raj Thackeray and BJP: 'धनुष्यबाण' झाला, घड्याळ आले, तरीही 'कमळ' 'इंजिन'मागे धावले? महायुतीत असे का व्हावे?)

माझी उमेवारी निश्चित!

नाना पटोले यांनी सांगलीची जागा काँग्रेस लढेल असे सांगितल्यानंतर. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी त्यांना जपून बोलले पाहिजे असा सल्ला दिला. दरम्यान, चंद्रहार पाटील यांनी भूमिका व्यक्त करताना म्हटले की, आपली उमेदवारी खुद्द उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केली आहे. त्यांनी आपणास फोन करुन उमेदवारी फिस्क असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण प्रचारालाही लागलो असल्याची माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली आहे. मिरजमध्ये 21 तारखेला होणाऱ्या सभेबाबत आमचे बोलणे झाले. महाविकासआघाडी म्हणून आम्ही एकत्र आलो असून तसेच काम करणार असल्याचेही चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे.