Sangli Crime News: सांगलीत दोन गटात तुफान राडा, जुन्या भांडणामुळे घरावर दगडफेक, 76 जणांवर गुन्हा दाखल

दोन गटात मारामारी झाल्याने 22 जण जखमी झाले आहे. पोलीसांनी (Police) या घटनेची नोंद घेत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

fight | pixabay.com

Sangli Crime News: सांगलीत (Sangli) दोन गटात मारामारी झाल्याने 22 जण जखमी झाले आहे. पोलीसांनी (Police) या घटनेची नोंद घेत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. जुन्या भांडणाच्या रागातून तुफान मारामारी झाली. मारामारीत दोन्ही गटांतील 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहे. या भयंकर मारामारीत लोखंडी गज, झांज पथकातील टाळ, काठ्या, दगड आणि विटांचा वापर करण्यात आला फिल्मी स्टाईल मारामारीत परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्लामपूर माकडवाले गल्लीत ही घटना घडली.

दोन्ही गटांनी पोलिसांत परस्परविरोधात तक्रार नोंदवला आहे. शांतता भंग, बेकायदा जमाव गर्दी, मारामारी केल्याने पोलीसांनी आरोपींवर गुन्हे नोंदवले आहे. विनोद पवारने या प्रकरणात तक्रार दिली. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणामुळे ही मारमारी करण्यात आली. प्रथमेशने घरावर  दगडफेक करीत नासधुस केल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात घरात उपस्थित असलेला १० जण जखमी झाले आहे.

दशरथ पवारने पोलीसांत दिलेल्या तक्रारानुसार, १२ जणांसोबत घरा बाहेर असलेले असताना, विनोद पवारने ३८ जणांचा जमाव घेऊन आला, सर्वांनी घरावर दगड फेक करीत नुकसान केले. या दोन्ही गुन्ह्यांचा इस्लामपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी स्वतंत्रपण तपास करीत आहेत. सांगलीत या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पुण्यात देखील दोन गटात हाणामारी झाल्याने एकाने जीव गमावला आहे. तर तीन जण जखमी झाले आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement