Sangli Accident: सांगली येथे विजापूर-गुहागर मार्गावर भीषण अपघात; पाच ठार, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

विजापूर-गुहागर राज्यमार्गावरील अमृत फाट्याजवळ मध्यरात्री हा अपघात झाला. स्विफ्ट कारने समोरुन येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने हा अपघात घडला.

Accident | Pixabay

सांगली जिल्ह्यातील जतमध्ये विजापूर-गुहागर राज्यमार्गावर भीषण अपघात झाला आहे. सांगलीच्या अमृतवाडी फाट्याजवळ मध्यरात्री स्विफ्ट कारचा अपघात या अपघाताच पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चार जण आणि चालक असे एकूण पाच जण या अपघातात मृत्युमुखी पडले. तर अपघातात एक मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सर्व मृत हे जतमधीलच असल्याचं समोर आलं आहे.

विजापूर-गुहागर राज्यमार्गावरील अमृत फाट्याजवळ मध्यरात्री हा अपघात झाला. स्विफ्ट कारने समोरुन येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने हा अपघात घडला. गाणगापूरला देवाचे दर्शन घेऊन विजयपूरमार्गे जतकडे येत असताना हा अपघात झाला. ज्यात पाच जणांनी आपले प्राण गमावले. या अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांनी लगेच धाव घेतली.

सांगलीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. विटा सातारा रोडवर नेवरी गावाजवळ 4 मे रोजी सकाळी ट्रॅव्हल्स आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 1 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश होता. कारमधील सर्वजण तासगाव तालुक्यातील गव्हाण गावचे होते

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement