सांगली: तहसीलदारांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

डबल महाराष्ट्र केसरी (Maharashtra Keshari) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) आणि त्याच्या साथीदारांनी सांगली जिल्ह्यातील खानापूरचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डबल महाराष्ट्र केसरी (Maharashtra Keshari) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) आणि त्याच्या साथीदारांनी सांगली जिल्ह्यातील खानापूरचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली होती.त्यामध्ये चंद्रहार पाटील यांच्याही गाड्यांचा समावेश होता. यामुळे चंद्रहार पाटील यांनी हा दंड कमी करावा, अशी मागणी शेळके यांच्याकडे केली होती. मात्र, दंड कमी करण्यास नकार दिल्यामुळे चंद्रहार पाटील आणि तहसीलदार शेळके यांच्यात वादावादी झाली. यातूनच चंद्रहार आणि त्यांच्या साथीदारांनी शेळके यांना मारहाण केली.

डबल महाराष्ट्र केसरी व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रहार पाटील यांच्याकडून तहसीदारांना मारहाण केल्याची माहिती समजताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील ऋषिकेश शेळके यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी अवैध वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी चंद्रहार यांच्यावर कारवाई केली होती. कारवाईत जप्त केलेल्या गाड्यांवर तब्बल साडे सात लाख रुपयांचा दंड तहसीलदार शेळके यांनी ठोठावला होता. हा दंड कमी करावा अशी मागणी वारंवार चंद्रहार पाटील यांच्याकडून तहसीलदार शेळके यांच्याकडे करण्यात येत होती. मात्र, तहसीलदार शेळके यांनी चंद्रहार पाटील यांना तुम्ही कायदेशीर अपील करा, मी दंड ठोठावला आहे आणि मीच पुन्हा दंड कमी करू शकत नाही, असे सांगितले होते. हाच राग मनात धरून आज दुपारी चंद्रहार पाटील हे विटा तहसील कार्यालयात पोहचले आणि तहसीलदार ऋषिकेश साळुंके यांना पुन्हा दंड कमी करण्याच्या मागणी करू लागले. मात्र, शेळके यांनी नकार दिल्याने हा वाद पेटला. हे देखील वाचा- महाराष्ट्र: लॉकडाउनचे सर्व नियम पाळून घरातल्या घरात वधूवरांचे लग्न, नाशिक पोलिसांनी अनोख्या शैलीत दिल्या शुभेच्छा (Video)

तसेच, अनेक भागात अवैध वाळूची वाहतूक होत आहे, अशा बातम्या आपल्या कानावर वारंवार पडत आहेत. ग्रामीण भागात अैवध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. तसेच याप्रकरणातील आरोपींवर कठोर शिक्षा केली जात आहे. तरीही काही भागात अवैध वाळूची वाहतूक होत आहे. मात्र, यात डबल महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील यांचे नाव आल्याने सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.