IPL Auction 2025 Live

मुंबई: MSRTC सांगली विभागातील 105 कर्मचारी BEST Buses ला सेवा देऊन गावी परतल्यानंतर आढळले कोरोना पॉझिटिव्ह

एस टी महामंडळ सांगली विभागाच्या काही कर्मचार्‍यांना कोरोनाच्या काळात मुंबईत दाखल करून त्यांना बेस्ट बस चालवण्याचं काम दिलं होतं.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये एकीकडे रूग्ण दुप्पटीचा दर शंभरी पार गेला आहे. नव्या रूग्णांची संख्या सातत्याने खालावत आहे अशावेळेस मुंबई मधून परतलेल्या 105 MSRTC बस कर्मचार्‍यांच्या कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. एस टी महामंडळ सांगली विभागाच्या काही कर्मचार्‍यांना कोरोनाच्या काळात मुंबईत दाखल करून त्यांना बेस्ट बस चालवण्याचं काम दिलं होतं. मात्र आता ते परतताच त्यांच्या अ‍ॅन्टिजन टेस्टचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. Coronavirus Cases In Mumbai: मुंबईकरांना दिलासा! कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट; गेल्या 24 तासात 804 नवे कोरोनाग्रस्त.

मुंबई मधील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी बेस्टने एसटी कडून कुमक मागवली होती. यामध्ये बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचादेखील समावेश होता. या महिन्याच्या सुरूवातीला भाडेततत्वावर अंदाजे 400 बस ड्रायव्हर आणि कंडक्टर मुंबई मध्ये आले. 100गाड्या सांगलीच्या विभागातून मुंबईला पाठवल्या होत्या.

आतापर्यंत या 400 पैकी सुमारे 105 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 25 ऑक्टोबरला सांगलीमध्ये आल्यानंतर त्यांची अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अशी माहिती एस टी मंडळाच्या सांगली विभागाने दिली आहे. सध्या सांगलीमधील कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान सांगलीच्या या कर्मचार्‍यांनी मुंबई मध्ये आल्यानंतर राहण्याची, खाण्या-पिण्याची आबाळ झाल्याची तक्रार केली आहे. त्यांना सुरूवातीचे काही दिवस रस्त्यावर जमीनीवर झोपून काढावे लागले. काहींना ताप, सर्दी झाली मात्र त्यांना घरी देखील जाण्याची परवानगी दिली नाही. तक्रार केल्यानंतर आम्हांला गोरेगावच्या लॉजमध्ये हलवण्यात आले.

राहण्याची गैरसोय केवळ पहिल्याच दिवशीच झाली. नंतर कर्मचार्‍यांना लॉजिंगमध्ये ठेवलं होते अशी माहिती देण्यात आली आहे,