ST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य

संगमनेर बस स्थानकामध्ये डिझेल नसल्याने नाशिककडे न जाता ते संगमनेर डेपो मध्ये थांबले होते. रात्री त्यांनी कापड्याच्या मदतीने बसमध्येच गळफास घेतला आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

एसटी बसच्या एका चालकाने अहमदनगर (Ahmednagar) मध्ये संगमनेर (Sangamner) बस डेपो मध्ये थांबलेल्या बसमध्येच गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. या धक्कादायक वृत्तानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार मृत एसटी बस चालकाचे नाव सुभाष तेलोरे आहे. अद्याप त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेले नाही.

सुभाष तेलोरे हे पाथर्डी-नाशिक बसचे चालक होते. संगमनेर बस स्थानकामध्ये डिझेल नसल्याने नाशिककडे न जाता ते संगमनेर डेपो मध्ये थांबले होते. रात्री त्यांनी कापड्याच्या मदतीने बसमध्येच गळफास घेतला आहे. सुभाष हे कोल्हार तालुक्यातील पाथर्डी चे रहिवासी होते. प्राथामिक माहितीनुसार, त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि त्यामध्येच दबून त्यांनी आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे. सुभाष तेलोरे यांच्याप्रमाणे धुळ्यातील एसटी चालक कमलेश बेडसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. (नक्की वाचा: MSRTC Recruitment 2021: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; येथे करा अर्ज).

कोरोना लॉकडाऊन नंतर हळूहळू आर्थिक घडी नीट बसवण्याचं काम सुरू आहे. पण सुरूवातीपासून आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची या महामारीमध्ये आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आहे. कर्मचार्‍यांचे पगार देखील अनियमित होत असल्याने अनेकांना घरखर्च चालवणं कठिण झालं आहे. महाराष्ट्र सरकारने मागील वर्षी एसटी महामंडळाला एक हजार कोटींचा निधी दिला होता. मात्र आता तो देखील संपल्याने मंडळाला कर्मचार्‍यांचे पगार करणं कठीण झालं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif