MSRTC Recruitment 2021: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; येथे करा अर्ज

सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात Maharashtra State Road Transport Corporation) दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे.

MSRTC Recruitment 2021: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; येथे करा अर्ज
ST Bus | (Photo Credits: MSRTC)

सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (Maharashtra State Road Transport Corporation) दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. यांसदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असून तब्बल 50 जागांसाठी ही भरती आहे. अप्रेंटिस (Apprentice) – मेकॅनिक डिझेल या पदासाठी ही भरती असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. (MSRTC Recruitment 2021: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 'या' पदांसाठी भरती; येथे करा अप्लाय)

या अप्रेंटिसशीपमध्ये 6000 ते 7615 रुपये इतका स्टायपेन मिळेल. सुरुवातीला 6 महिने ट्रेनिंग झाल्यावर ऑनजॉब ट्रेनिंग सुरु होईल. नोकरीची गरज असलेले पात्र उमेदवार नक्कीच अर्ज करु शकतात. (MSRTC चा मोठा निर्णय, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी बस लावणार अँटिमायक्रोबियकल केमिकल कोटिंग)

जागा:

एकूण 50

पदं:

अप्रेंटिस – मेकॅनिक डिझेल (Apprentice – Mechanic Diesel)

शैक्षणिक पात्रता:

दहावी पास असणं आवश्यक.

वेतन:

या अप्रेंटिसशीपमध्ये 6000 ते 7615 रुपये इतका स्टायपेन मिळेल.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही भरती असून यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity-view/611f4ecdf6f9d70479046a83 या लिंकवर क्लिक करा. यात तुम्हाला सुरुवातीला 6 महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. त्यानंतर 19 महिन्यांचे ऑनजॉब ट्रेनिंग असेल.

दरम्यान, सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारांना नोकरी, रोजगाराचे साधन हवे आहे. त्यांच्यासाठी आणि सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. दहावी पर्यंत शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी मिळण्याची ही संधी अजिबात दवडू नका.

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2021 04:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).