कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर संगमनेर न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यासंदर्भात आज सुनावणी; येत्या 7 ऑगस्ट ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यावर संगमनेर न्यायालयात (Sangamner Court) दाखल केलेल्या खटल्यासंदर्भात आज सुनावणी झाली. या सुनावणीत इंदोरीकर महाराजांना आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश संगमनेर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत. येत्या 7 ऑगस्टला इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स संगमनेर न्यायालयाने बजावले आहे.

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर संगमनेर न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यासंदर्भात आज सुनावणी; येत्या 7 ऑगस्ट ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Indurikar Maharaj (Photo Credits: Facebook)

प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यावर संगमनेर न्यायालयात (Sangamner Court) दाखल केलेल्या खटल्यासंदर्भात आज सुनावणी झाली. या सुनावणीत इंदोरीकर महाराजांना आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश संगमनेर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत. येत्या 7 ऑगस्टला इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स संगमनेर न्यायालयाने बजावले आहे.

पुत्र प्राप्तीसाठी सम-विषम फॉर्म्युला सांगितल्या प्रकरणी इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्यानुसार, संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी आज संगमनेर न्यायालयात झाली. दरम्यान न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली आहे. इंदुरीकर महाराजांनी पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात PCPNDT कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा - Maharashtra Monsoon 2020 Forecast: मुंबई, कोकण परिसरात 3, 4 जुलै दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याने जारी केला ऑरेंज अलर्ट)

दरम्यान, रंजना गवांदे यांनी इंदोरीकर महाराजांवर राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल केला जात नव्हता, असा आरोप केला होता. इंदोरीकर महाराज यांचे वक्तव्य हे कायद्याविरोधात असल्याचेदेखील त्यांनी तक्रारीत म्हटले होते.

काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज -

इंदोरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या किर्तनात 'सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा जन्मास येईल आणि विषम तारखेला स्त्री संग केल्यास मुलगी होते', असं वादग्रस्त वक्तव्य केलं होते. इंदोरीकर यांचे हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा आरोप PCPNDT (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act, 1994) समितीच्या सदस्यांनी केला होता.

(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2020 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).