Samruddhi Expressway Accident: अमरावतीत समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

रात्री एकच्या सुमारास ट्रकचा अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Samruddhi Mahamarg, Accident (PC - ANI/File Photo)

समृद्धी महामार्गावरील अपघात (Samruddhi Expressway Accident) काही केल्या कमी होताना दिसत नाही. 30 जून 2023 रोजी येथे विदर्भ ट्रॅव्हल्सचा (Vidharbha Travels) भीषण अपघात झाला. या अपघातात 26 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघाताच्यानंतर देखील या ठिकाणी अपघात काही केल्या कमी होतांना दिसत नाही आहे. या महामार्गावरील अपघातात  अनेकांनी आपले प्राण हे गमावले आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यात समृद्धीवर पुन्हा भीषण अपघाताची घटना घडलीये. रात्री एकच्या सुमारास ट्रकचा अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. झोप लागल्याने चालक आणि वाहकाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  (हेही वाचा - Nanded Accident: नांदेडमध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात; काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू)

तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सरद ट्रक नागपूरयेथून मुंबईकडे निघाला होता. रात्रीच्यावेळी झोप लागल्याने पुलाच्या सिमेंट कठड्यावर ट्रॅक धडकला. समृद्धीवर ट्रक वेगात होता. भरधाव ट्रक इतका जोरात धडकला की ट्रकच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झालाय.

भरधाव वेगातील दुचाकी कारवर अदळल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय. नांदेड शहरालगत असलेल्या हसापूर बायपासवरील मामा चौक परिसरात ही घटना घडली आहे. सदर घटनेत रोहित मुदिराज असं मयत तरुणाचे नाव आहे. स्वातंत्र्य दिना निमित्त मित्रांनी मोटार सायकल रॅली काढली होती.

 

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif