Samruddha Jeevan Chit Fund Case: CID ने जप्त केला Mahesh Motewar यांनी दगडूशेठ गणपतीला अर्पण केलेला अंदाजे 60 लाखांचा सोन्याचा हार

गुंतवणूकदारांना फसवणूक आलेले पैसे पुन्हा कुठे गुंतवले याचा शोध सध्या सुरू आहे.

Mahesh Motewar | Photo Credits: Twitter and WikiCommons

समृद्ध जीवनचे महेश मोतेवार (Mahesh Motewar) यांनी पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीला (Dagdusheth Halwai Ganpati) अपर्ण केलेला सव्वा किलोचा सोन्याचा हार सीयडी ने जप्त केला आहे. दरम्यान या हाराची किंमत 60 लाख पर्यंट असण्याचा अंदाज आहे. आता हा हार दगडूशेठ गणपती मंदिराच्या ट्रस्टने सीआयडी कडे दिला आहे. शेतकरी, कष्टकरी यांना फसवून मिळवलेल्या पैशामधून मोतेवार यांनी हार बनवला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सीआयडीने त्यावर जप्ती आणली आहे.

महाराष्ट्रात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व अन्य व्यवसायाची जोड म्हणून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचं आमिष दाखवत मोतेवार यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. यामुळेच त्यांच्यावर विविध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहे. दरम्यान सध्या मोतेवार हे ओरिसा कारागृहामध्ये आहेत या प्रकरणी त्यांचा सीआयडी तपास सुरू आहे.

महेश मोतेवार यांच्यावरील आर्थिक गुन्ह्यांच्या, आरोपांचा तपास सीयडीची आर्थिक गुन्हे टीम करत आहे. गुंतवणूकदारांना फसवणूक आलेले पैसे पुन्हा कुठे गुंतवले याचा शोध सध्या सुरू आहे. या तपासामध्येच सीआयडीला दगडूशेठ गणपतीला त्यांनी दान केलेल्या हाराची लिंक सापडली आणि आता तो हार जप्त करण्यात आला आहे.