IPL Auction 2025 Live

मनसे च्या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेड चा विरोध; जाणून घ्या त्या मागचं कारण

त्याच सोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळणार असल्याचेही बोलले जात आहे.

MNS New Flag (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच आपल्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. त्याच सोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळणार असल्याचेही बोलले जात आहे. परंतु, मनसेच्या नव्या झेंड्याबद्दल (MNS New Flag) कोणतीही अधिकृत माहिती येण्याआधीच त्याला विरोध दर्शवण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेड या संघटनेकडून मनसेच्या नव्या झेंड्याला विरोध करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ ही राजकारण करण्याचे साधन नसल्याने ती वापरू नये असं संभाजी ब्रिगेडचं मत आहे.

टीव्ही 9 मराठीने दिलेल्या माहितीनुसार, “मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समतेचा भगवा झेंडा घेतला असेल तर आम्ही नक्कीच त्याचे स्वागत करु. आम्ही भारतीय संविधान आणि लोकशाहीला मानणारे व्यक्ती आहोत. परंतु झेंड्यावर ‘राजमुद्रा’ वापरणं हे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड अजिबात सहन करणार नाही. भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांनीही शांतीचे प्रतीक म्हणून भगवा झेंडा स्विकारला होता. हेच मनसेनेही स्विकारावं, त्यांनी हिंदुत्वाची झालंर पांघरु नये”, असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे पहिले महाअधिवेशन गोरेगाव येथील नॅस्को मैदानावर आयोजित केले आहे. या अधिवेशनादरम्यानच राज ठाकरे नव्या ध्वजाचे अनावरण करणार आहेत असं बोललं जातंय.

शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या हजारो कार्यकर्त्यांनी हाती घेतला मनसे चा झेंडा; राज ठाकरे यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

दरम्यान, राज ठाकरे हे पक्षाच्या झेंड्यासोबतच, पक्षाची विचारसरणी देखील बदलणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार, ते हिंदुत्वाचा मुद्दा धरून या पुढे राजकीय वाटचाल करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.