शिवप्रेमींचा विजय! संभाजी बिडी चे झाले नामांतरण, 'साबळे बिडी' म्हणून होणार विक्री

या घोषणेमुळए सर्व शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Sambhaji Bidi (Photo Credits: YouTube)

गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींचा संभाजी बिडीचे (Sambhaji Bidi) नाव बदलण्याची सुरु असलेल्या लढ्याला आज अखेर न्याय मिळाला. साबळे वाघिरे कंपनीने (Sabale Waghire Company) चार महिन्यांपूर्वी संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज या संभाजी बिडीचे नाव बदलून 'साबळे बिडी' (Sabale Bidi) असे ठेवण्यात आल्याचे जाहीर केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी बिग्रेड आणि शिवप्रेमी संघटना या नामांतराची मागणी करत होते. त्या सर्वांच्या प्रयत्नांना आज अखेर यश मिळाले आहे. त्यामुळे आता साबळे बिडी या नावाने संभाजी बिडीची विक्री होणार आहे. या घोषणेमुळए सर्व शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शिवप्रेमींनी याबाबत सोशल मिडियावर पोस्ट करुन याबाबत आनंद व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने विकली जाणारी 'संभाजी बिडी' हिचे नाव बदललण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्यात चार महिन्यापूर्वी म्हणजेच सप्टेंबरमध्ये साबळे वाघिरे कंपनीने नाव बदललण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हे नाव बदललण्यास थोडा वेळ लागेल अशी माहितीही कंपनीने दिली होती. त्यात आज अखेर या बिडीचे नाव बदलून साबळे बिडी ठेवण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Sambhaji Bidi’s Name Will Be Changed: शिवप्रेमीच्या लढ्याला अखेर यश, संभाजी बिडीचं नाव बदलणार; कंपनीने घेतला निर्णय

संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन, इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले होते.

छत्रपती संभाजी महाराजांचं नाव अशा पद्धतीने वापरलं जाऊ नये, यासाठी संभाजी ब्रिगेडने अनेक वर्षापासून हा विषय लावून धरला होता. गेल्या वर्षी कोल्हापुरातही संभाजी बिडीविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. राज्यातील अनेक ठिकाणी हे आंदोलन पाहायला मिळालं होतं. मात्र या सर्व प्रयत्नांना आज अखेर यश मिळाले. या घोषणेनंतर शिवप्रेमींमध्ये जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.