Derogatory Remarks Against Mahatma Gandhi: संभाजी भिडेंच्या अडचणी वाढल्या; महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

राज्याच्या गृहमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी खंतही यावेळी तुषार गांधी यांनी व्यक्त केली.

Sambhaji Bhide (PC - Facebook)

Derogatory Remarks Against Mahatma Gandhi: महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी गुरुवारी हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या विरोधात राष्ट्रपिता यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल तक्रार दाखल केली. 'भिडे गुरुजी' म्हणून ओळखले जाणारे संभाजी भिडे यांच्यावर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यातील एका कार्यक्रमात महात्मा गांधींच्या वंशाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक भिडे यांच्या विरोधात अमरावती आणि नाशिक येथे प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. तुषार गांधी तसेच त्यांचे वकील असीम सरोदे आणि इतर लोकांनी गुरुवारी पुणे शहरातील डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनला भेट दिली आणि भिडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 499 (बदनामी), 153 (ए) (विविध गटांमधील शत्रुत्व वाढवणे) आणि 505 (सार्वजनिक गैरव्यवहारास कारणीभूत विधान) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. (हेही वाचा - Thane: कर्जाची परतफेड करू न शकल्याने ठाण्यातील व्यक्तीने उचलले धक्कादायक पाऊल; कर्ज वसूली अधिकाऱ्यांसमोर कीटकनाशन प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न)

पत्रकारांशी बोलताना तुषार गांधी म्हणाले, भिडे यांनी केवळ बापूंविरोधातच अपमानास्पद वक्तव्य केले नाही तर त्यांच्या कुटुंबाविरोधातही अपमानास्पद वक्तव्य केले आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी खंतही यावेळी तुषार गांधी यांनी व्यक्त केली.

गांधी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी भिडे यांच्यावर आयपीसी कलमांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली असून त्यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. डेक्कन पोलिस स्टेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला गांधी यांच्याकडून तक्रार अर्ज आला असून आम्ही यासंदर्भात चौकशी करत आहोत. भिडे यांनी याआधीही अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ज्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif