Salon, Beauty Parlor Will Start Soon In Maharashtra: सलून, ब्युटी पार्लर सुरु करण्याबाबत महाराष्ट्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत; राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. लाकडाउनमुळे राज्यात उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत.
संपूर्ण देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. लाकडाउनमुळे राज्यात उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. ज्यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावा लागत आहे. दरम्यान, सलून (Salon) आणि ब्युटी पार्लर (Beauty Parlor) बंद असल्याने नाभिक समाजाला बरोजगारीचा सामना करावा लागत आहे. राज्यात 3 जूनपासून लॉकडाउनच्या काही नियमांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर राज्यात लवकरच सलून आणि ब्युटी पार्लर सुरु करण्याचा राज्य सरकार निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिली आहे.
कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हातावर पोट भरणाऱ्या लोकांचे अधिक हाल होत आहेत. राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर बंद असल्यामुळे नाभिक समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकतीच विजय वडेट्टीवार यांची गडचिरोली येथे पत्रकार परिषदे पार पडली आहे. दरम्यान ते म्हणाले की, व्यवसाय बुडाल्याने राज्यभरातील नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व सलून आणि पार्लर सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. यासंदर्भात येत्या आठवडाभरात सरकार निर्णय घेणार आहे. परंतु,सलून सुरु झाल्यानंतर सामाजिक अंतर व अन्य अटींचे पालन करावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे देखील वाचा- माझे मुख्यमंत्रीपद गेले, यावर विश्वास बसायला मला दोन दिवस लागले; विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
तसेच, गडचिरोली आणि अहेरी येथे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी डीजिटल अत्याधुनिक अभ्यासिका सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थी व सर्वसाधारण विद्यार्थ्यांना अनुक्रमे 70 व 30 टक्के याप्रमाणे त्याचा लाभ घेता येणार आहे. 50 एकर जागेत रोजगार प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.लष्करी प्रशिक्षणाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिस्तबद्धतेची शिकवण तिथे मिळेल. जिल्ह्यातून चांगले अधिकारी निर्माण होण्यासाठी व शिक्षणाची गोडी स्थानिक युवकांना लागण्यासाठी याचे नियोजन आम्ही करत आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजुरी मिळालेले मेडिकल कॉलेज पुढील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर नियोजन करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले आहेत.