Sajjan Jindal on Rape Allegations: बलात्काराच्या आरोपांवर अखेर सज्जन जिंदाल यांनी सोडले मौन; निवेदन जारी करून मांडली आपली बाजू

अखेर 13 डिसेंबर 2023 रोजी एफआयआर दाखल करण्यात आला.

Sajjan Jindal (संग्रहित संपादित प्रतिमा)

जेएसडब्ल्यू ग्रुपचे (JSW Group) व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल (Sajjan Jindal) यांच्याविरुद्ध बलात्काराचा (Rape) आरोप करण्यात आला आहे. याबाबत एफआयआरही दाखल झाला आहे. मुंबईतील एका महिला डॉक्टरने 64 वर्षीय सज्जन जिंदाल विरोधात वांद्रे कुर्ला पोलिस ठाण्यात बुधवारी, 13 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली होती. ही बातमी समोर आल्यानंतर आता सज्जन जिंदाल यांनी या महिलेने लावलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपले मौन सोडले आहे.

रविवारी, 17 डिसेंबर रोजी त्यांनी एक निवेदन जारी करून या गोष्टीबाबत आपली बाजू मांडली. जारी केलेल्या निवेदनात, सज्जन जिंदाल यांनी म्हटले आहे, ‘सज्जन जिंदाल यांनी हे खोटे आणि निराधार आरोप फेटाळून लावले आहेत. ते संपूर्ण तपासात सहकार्य करण्यास कटिबद्ध आहेत. प्रकरणाचा तपास चालू असल्याने सध्या यावर अधिक भाष्य करता येणार नाही. आम्ही आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो.’

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी 16 फेब्रुवारी रोजी ही महिला पहिल्यांदा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेली होती आणि जिंदालवर बलात्काराचा आरोप केला होता. अखेर 13 डिसेंबर 2023 रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. महिलेच्या दाव्यानुसार ही कथित घटना 24 जानेवारी 2022 रोजी बीकेसी येथील कंपनीच्या कॉर्पोरेट इमारतीत घडली. एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 376, 354 आणि 506 अंतर्गत आरोप आहेत. (हेही वाचा: Mumbai Gangrape: धक्कादायक! मुंबईत मित्राच्या पत्नीवर सामुहिक बलात्कार, पतीसह दोघांवर गुन्हा दाखल)

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारा एफआयआर दाखल करण्यात आला. या महिला तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने न्यायालयात तिचे वकील रिजवान मर्चंट यांच्यामार्फत जिंदाल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याबाबत रिट याचिका दाखल केली होती.



संबंधित बातम्या