Rape Complaint Against Sajjan Jindal: सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप, वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

एका अभिनेत्रीने जेएसडब्ल्यू समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे

Rape Complaint Against Sajjan Jindal

Rape Complaint Against Sajjan Jindal: एका अभिनेत्रीने जेएसडब्ल्यू समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. पीडित अभिनेत्रीने १३ डिसेंबर रोजी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना जानेवारी २०२२ मध्ये वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या वर असलेल्या पेंटहाऊसमध्ये घडली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तीच्या तक्रारीकडे पोलिस ठाण्यात दुर्लक्ष केले, ज्यामुळे तिला कोर्टात जावे लागले, असे पीडित अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. हेही वाचा-चालत्या बसमध्ये तरुणीवर चालकांकडून सामुहिक बलात्कार)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसा, पीडित अभिनेती आणि सज्जन जिंदाल यांची २०२१ मध्ये दुबईमध्ये पहिल्यांदा भेट झाली होती.या वेळी दोघेही आयपीएलचा सामना पाहण्यासाठी आले होते. आयपीएल सामना पाहण्यासाठी व्हीयापी बॉक्समध्ये बसले होते. यानंतर दोघेजण जयपूर येथे लग्न कार्यक्रामात भेटले त्यानंतर मुंबईत एकदा भेट झाली. मालमत्ता खरेदी करण्यासंदर्भात एकमेकांना संपर्क वाढवला. एकट्या भेटीत पीडित अभिनेत्रीशी जवळीक साधू लागला तीच्यावर बळजबरीने अत्याचार केला. अभिनेत्रीने त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले होते. पण त्यांनी माझ्याशी बोलणे बंद केले. त्यानंतर जून २०२२ पासून सज्जनने नंबर ब्लॉक केले.

पोलिसांत तक्रार केले तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी सज्जनने पीडितेला दिली.  अभिनेत्रीने फेब्रुवारी २०२३ मध्ये बीकेसी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. पण पोलिसांनी त्याची दखल न घेतल्यामुळे पीडितेने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यायालयाने बीकेसी पोलिस ठाण्याला सदर तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिले.