Sahitya Akademi Award 2019 Full List: कवयित्री अनुराधा पाटील यांच्या काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार घोषित

पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे.

अनुराधा पाटील (संग्रहित संपादित प्रतिमा)

मराठीमधील ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील (Anuradha Patil) यांना यंदाचा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार (Sahitya Akademi Award 2019) जाहीर झाला. पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे. देशातील एकूण 23 भाषांमधील साहित्यकृतींसाठीच्या साहित्य अकादमी पुरस्काराची काल घोषणा करण्यात आली. हिंदीसाठी नंदकिशोर आचार्य, इंग्रजीसाठी खासदार डॉ शशी थरूर, उर्दू भाषेसाठी प्रा. शाफे किदवई आणि पंजाबी भाषेसाठी किरपाल कझाक यांची निवड 2019 च्या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार सात काव्यसंग्रह, चार कादंबऱ्या, सहा कथासंग्रह, तीन निबंध संग्रह, एक-एक कथेतर गद्य, आत्मचरित्र आणि चरित्र यासाठी जाहीर केले आहेत.

या साहित्यिकांना मिळाले पुरस्कार –

असमिया - जय श्री गोस्वामी महंत

बाड्ला - चिन्मय गुहा

बोडो - फुकन चन्द्र

डोगरी - ओम शर्मा

गुजराती- रतिलाल बोरीसागर

कन्नड - विजया

कश्मीरी- अब्दुल अहद हाज़िनी

कोंकणी - निलबा खांडेकर

मैथिली - कुमार मनीष

मलयालम- मधुसूदन नायर

मणिपुरी - बेरिल

मराठी- अनुराधा पाटील

ओड़िया - तरूण कांति

पंजाबी - किरपाल कज़ाक

राजस्थानी- रामस्वरूप किसान

संस्कृत - पेन्ना मधुसूदन

संताली - काली चरण

सिंधी - ईश्वर मूरजाणी

तमिल- धर्मन

तेलुगु - बंदि नारायणा स्वामी

साहित्य विश्वातील एक प्रतिष्ठीत पुरस्कार म्हणून साहित्य अकादमीकडे पहिले जाते.  ताम्रपत्र, शाल, आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2017 दरम्यान प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. घोषित पुरस्कार 25 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्ली येथे आयोजित एका विशेष समारंभात (साहित्योत्सव) देण्यात येणार आहेत. (हेही वाचा: Jnanpith Award 2019: मल्याळम कवी अक्किथम यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर)

दरम्यान, यंदाच्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. मल्याळम कवी अक्किथम (Akkitham) यांना 55 वा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. आतापर्यंत हिंदी भाषेत 11, कन्नड भाषेत 8, बंगाली भाषेत 6 तर गुजराती, मराठी, ओडिया आणि उर्दू भाषेत 4 ज्ञानपीठ पुरस्कार दिले गेले आहेत.