SDC Merger to Cosmos Bank: साहेबराव देशमुख को-ऑप बँकेचे कॉसमॉस बँकेत विलीनीकरण, RBI ची मान्यता
साहेबराव देशमुख सहकारी बँक (Sahebrao Deshmukh Co op bank) आणि मराठा सहकारी बँक (Maratha Sahakari Bank) यांचे आज म्हणजेच 26 सप्टेंबर 2023 पासून कॉसमॉस बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारा देण्यात आलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील दोन बँका कॉसमॉस बँकेमध्ये (Cosmos Bank) विलीन करण्यात येणार आहेत. यात पहिली आहे. मुंबईस्थित साहेबराव देशमुख सहकारी बँक (Sahebrao Deshmukh Co op bank) आणि दुसरी आहे मराठा सहकारी बँक (Maratha Sahakari Bank). आज म्हणजेच 26 सप्टेंबर 2023 पासून हे विलीनीकरण अंमलात आले. त्यामुळे यापुढे एसडीसी बँकेच्या सर्व शाखा या कॉसमॉस बँकेच्या शाखा म्हणून सक्रीय असतील. दोन्ही बँकेच्या भागधारकांनी विलीनीकरणास मान्यता दिली होती. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी या आधीच म्हटले होते की, कॉसमॉस बँक या दोन बँकांच्या अधिग्रहणांसह विस्तार करण्याचा विचार करत आहे. बँकेला मुंबई येथील विस्तार वाढवायचा आहे.
प्राप्त माहितीनुसार, साहेबराव देशमुख को-ऑप बँकेचा 11 शाखांच्या माध्यमातून जवळपास 244 कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. तर मराठा सहकारी बँकेचा 7 शाखांमधून 162 कोटी रुपयांचा व्यवहार आहे. कॉसमॉस बँकेबाबत बोलायचे तर ही बँक जवळपास 7 राज्यांमध्ये सक्रीय आहे. विविध राज्यांमध्ये मिळून बँकेच्या 159 शाखा आहेत. ज्या आता या दोन बँकांच्या विलीनकरणामुळे वाढणार आहेत.
कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष काळे यांनी विलीनीकरणाबाबत मे 203 मध्ये भाष्य केले होते. त्यानुसार बँकेचे जाळे 200 शांखांपर्यंत विस्तारायचे व्यवस्थापनाचे उद्दीष्ठ आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात आणखी काही कॉ-ऑफरेटीव्ह बँका विलीनीकरणाच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात येतील. या बँकेने आतापर्यंत 16 नागरी सरकारी बँका अधिकग्रहीत केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
द हिंदू बिझनेस लाईन डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, कॉसमॉस बँकेचा एकवर्षापूर्वीचा ताळेबंद 28,815 कोटी रुपये होता. जो आता 30,745 कोटी रुपये झाला आहे. बँकेचे सकल एनपीए गुणोत्तर 6.86 टक्क्यांवरून 4.8 टक्क्यांवर आणि निव्वळ एनपीए गुणोत्तर 4.74 टक्क्यांवरून 1.74 टक्क्यांवर पोहोचले आहे. याने FY23 साठी 213 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. जो FY22 मध्ये ₹84 कोटी होता आणि त्याचे भांडवल पर्याप्तता प्रमाण 13.55 टक्के होते.