आता मुंबईकरांना थेट नळाचं पाणी पिणं सुरक्षित; पाण्यातील Coliform Bacteria चं प्रमाण सुरक्षित स्तरावर असल्याचा BMC चा अहवाल

त्यामध्ये Coliform Bacteria चे प्रमाण 0.7% असल्याचं म्हटलं आहे. WHO च्या अहवालानुसार Coliform Bacteria 5% असणं पिण्यासाठी सुरक्षित आहे.

पाणी कपात Photo credit: Wiki Commons

मुंबईकरांना लवकरच थेट नळाचं पाणी पिणं सुरक्षित असेल असा अहवाल मुंबई महानगर पालिकेचे (BMC) हायड्रोलिक इंजिनियर अशोल तवाडिया यांनी टाईम्स ऑफ इंडिया शी बोलताना सांगितले आहे. एप्रिल 2018 ते मार्च 2019 च्या दरम्यान मुंबईतील विविध भागामधील पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये Coliform Bacteria चे प्रमाण 0.7% असल्याचं म्हटलं आहे. WHO च्या अहवालानुसार Coliform Bacteria 5% असणं पिण्यासाठी सुरक्षित आहे.

रहिवाशी संस्थांनी आता पिण्याचं पाणी, टाकी सुरक्षित आणि स्वच्छ राहील याची काळजी घ्यायला हवी. पाण्यातील अशुद्धतेमुळे मुंबईमध्ये दरवर्षी अनेकजण डायरिया सारख्या आजाराचे बळी पडतात. दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया सारखे साथीचे आजार पसरतात. मुंबईलाही बसणार पाणीटंचाईच्या झळा?; सध्या धरणांत फक्त 22 टक्के पाणीसाठा शिल्लक

आंतरराष्ट्रीय एजंसीने दिलेल्या माहितीनुसार, भांडूपमधील बीएमसीच्या मास्टर बॅलेन्स रिसरवायर मध्ये जगातील सर्वात शुद्ध पाण्याचा साठा आहे. परंतू पुरवठा लाईन खराब असल्याने नागरिकांना मिळणारे पाणी निकृष्ट दर्जाचे होते.

2018 च्या डिसेंबर महिन्यात 7000 किमी शुद्ध पाण्याचा प्रवाह आहे. त्यामधील कोलीफॉर्म आणि ई कोली या विषाणूंचे प्रमाण कमी झालं आहे. मार्चमध्ये अशा अनफीट नमुन्यांचे प्रमाण 0.7 % झालं आहे.