Sachin Vaze Suspend: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे निलंबन
वाझे यांना शनिवारी रात्री NIA कडून अटक करण्यात आली होती. तर आता NIA कडून वाझे यांना PPE किट घालून क्राइम सीन रिक्रिएट करण्यात येणार आहे.
Sachin Vaze Suspend: मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे निलंबन करण्यात आले आहेत. वाझे यांना शनिवारी रात्री NIA कडून अटक करण्यात आली होती. तर आता NIA कडून वाझे यांना PPE किट घालून क्राइम सीन रिक्रिएट करण्यात येणार आहे. 25 फेब्रुवारीला एक व्यक्ती पीपीई किट घालून जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले होते. तोच व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ विस्फोटकांनी भरलेल्या कारजवळून जात असल्याचे दिसले. त्यामुळे आता एनआयएला संशय आहे की, हाच तोच व्यक्ती आहे ज्याने अंबानींच्या घराजवळ स्कॉर्पिओ उभी केली होती.
याच दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये एक बैठक झाली. त्यावेळी अँन्टेलिया जवळ घडलेल्या घटनेबद्दल पुन्हा एकदा चर्चा झाल्यानंतरतच आता वाझे यांचे निलंबन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर वाझे यांच्यासोबत काम करणाऱ्या CIU चे अधिकारी आणि कॉन्स्टेबलला दुसऱ्यांदा NIA ने आज चौकशीसाठी बोलावले आहे.(Mansukh Hiren Death Case: 'त्या' रात्री सचिन वाझे तिथे होते का? एनआयए करतंय तपास)
Tweet:
NIA यांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोवा आणि स्कॉर्पिओच्या चालकांचा शोध लागला आहे. या दोघांची चौकशी केली जात असून त्यांना अटक केली जाऊ शकते. हे दोघे ही वाझे यांचे निकटवर्तीय असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचसोबत NIA कडून वाझे यांच्या ठाण्यातील घरी सुद्धा चौकशी केली गेली होती. 2 मार्च ते आतापर्यंत चे CCTV फुटेज ही NIA कडून ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच रहिवाशांची सुद्धा चौकशी केली जात आहे. वाझे यांना स्पेशल कोर्टाने 14 मार्च ते 25 मार्च दरम्यान NIA कोठडी सुनावली आहे.