Nana Patole on Devendra Fadnavis: परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर देवेंद्र फडणवीस यांची टीका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रत्युत्तर

वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये जनतेने पाहिले आहे. आरएसएसचा वाटा आरएसएसपर्यंत कसा पोहोचत होता. आरएसएसची लोकं मंत्रालय आणि प्रत्येक विभागात कशी कार्यरत होती हे जनतेला माहिती आहे.

Nana Patole on Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवास्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या भरलेली उभी केलेली स्कॉर्पिओ, मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यू प्रकरण, या प्रकरणात एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्यावर झालले आरोप, सोबतच राज्यात सुरु असलेले फोन टॅपींग ( Phone Tapping) प्रकरण या सर्व प्रकरणांवरुन विरोधी पक्ष सध्या जोरदार आक्रमक आहे. विरोधी पक्षनेता असेलेल देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर दररोज जोरदार आरोप करत आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आरोप आणि टीकेला काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यातील भाजप नेत्यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर टीका करत काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष असल्याचे म्हटले. तसेच, परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपकडे अंगूलीनिर्देश करत काँग्रेसने त्यांचा हिस्सा किती हेही सांगावे असे म्हटले. (हेही वाचा, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाचं राज्यपालांच्या भेटीनंतर महाविकास आघाडी वर टीकास्त्र; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मौन चिंताजनक: देवेंद्र फडणवीस)

फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी म्हटले की, आम्ही देश विकून कधीही देश चालवला नाही. वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये जनतेने पाहिले आहे. आरएसएसचा वाटा आरएसएसपर्यंत कसा पोहोचत होता. आरएसएसची लोकं मंत्रालय आणि प्रत्येक विभागात कशी कार्यरत होती हे जनतेला माहिती आहे. मंत्रालयात आरएसएसची लोकं किती होती? याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टींवर चर्चा करणार आहोत, असे नाना पटोले यांनी या वेळी सांगितले.

काँग्रेसने देश उभा केला. जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत. तेच आज आरोप करत आहेत अशी टीका करतानाच आम्ही देश विकून चालवला नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.

दरम्यान, मी स्वत: जर सरकारमध्ये (मंत्रिमंडळ) असतो तर परमवीर सिंग यांना केवळ बदली करुन थांबलो नसतो. तर त्यांचे थेट निलंबन केले असते, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणानंतर हे सगळं सुरु झालं. मुंबई सारख्या शहरात अशी घटना घडत असेल आणि आयुक्त गुन्हे दाखल करायला नाही म्हणत असतील तर अशा पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबनच केले असते असे पटोले यांनी या वेळी सांगितले.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस स्वत: न्यायाधीश असल्यासारखे वागत होते. मंत्र्यावर आरोप झाले की लगेच ते त्यांना क्लिन चीट देत असत. त्या वेळी का कोणा एखाद्या नेत्याचा राजीनामा घेतला नाही? असा सवालही पटोले यांनी या वेळी उपस्थित केला.