Sachin Vaze Dismissed: सचिन वाझे बडतर्फ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे आदेश

भारतीय राज्यघटनेच्या कलम 311 (2) (ब) अन्वये सचिन वाझे याच्यावरकारवाई करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर सांगण्यात आले आहे.

Sachin Vaze | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई पोलीस दलातून सचिन वाझे (Sachin Vaze Dismissed) याला बडतर्फ करण्यात आले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ( (Mukesh Ambani Bomb Scare) असलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी आणि याच प्रकरणात व्यवसायिक मनसूख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सचिन वाझे (Sachin Vaze) याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सचिन वाझे हा मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन (API) होता. या प्रकरणात नाव आल्यानंतर त्याच्यावर पहिल्यांदा निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस दलातील त्याची सेवाही संपुष्टा आणण्यात आली आहे. सचिन वाझे याच्या बडतर्फीचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale) यांनी मंगळवारी काढले. सचि वाझे याला 13 मार्च या दिवशी अटक करण्यात आली होती.  भारतीय राज्यघटनेच्या कलम 311  (2) (ब) अन्वये सचिन वाझे याच्यावरकारवाई करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर सांगण्यात आले आहे.

सचिन वाझे याच्यानंतर आता त्याला मदत करणारे पोलीस अधिकारी रियाझ काझी आणि सुनील माने यांच्यावरही लवकरच बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. साधारण तीन दशकांपूर्वी म्हणजेच नव्वदच्या दशकात महाराष्ट्र पोलीस दलातील एक जबरदस्त ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट' अशी सचिन वाझे यांची ओळख झाली होती. दरम्यान, बनावट एन्काऊंटर केल्याच्या आरोपाखाली त्याला सेवेतून निलंबीत करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी 2020 मध्ये त्याला पोलीस सेवेत परत घेण्यात आले होते.

दरम्यान, सचिन वाझे याच्याबरोबर त्याला सहकार्य करणारे आणखी एक अधिकारी सुनील माने हे कांदिवली क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक आहेत. माने यांचीही एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये त्यांची चौकशी सुरु होती. सचिन वाझे यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभा केलेल्या कारमधील स्फोटकं आणि या एकूण प्रकरणाची माहिती सुनील माने यांना होती असा दावा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) केला होता. (हेही वाचा, Mumbai Police Transfer: सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद, मुंबई पोलीस दलात बदलीची लाट; 65 पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी)

अँटीलिया स्फोटक प्रकरण, मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणा या एकूणच प्रकरणांचा तपास आता एनआयएकडे गेला आहे. या तपास प्रकरणात सचिन वाझे याच्यासोबत अनेकांना अटक करण्यात आली आहे. अद्यापही या प्रकरणाचा तपास सुरु आहे.