Shiv Sena on NIA: 'एनआयए'ने उरी, पठाणकोट, पुलवामा हल्ला प्रकरणात काय तपास केला? शिवसेनेचा सवाल

या सगळ्यांवरुन शिवसेना मुखपत्र दैनिक सामनातून जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

NIA | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दहशतवादासंदर्भातील प्रकरणाचा तपास 'एनआयए' करत असते. पण जिलेटिनच्या कांड्यांचा तपास करणाऱ्या 'एनआयए'ने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला व पुलवामा हल्ल्यात काय तपास केला, कोणते सत्यशोधन केले. किती गुन्हेगारांना अटक केली हेसुद्धा रहस्यच आहे. पण मुंबईतील वीस जिलेटिन कांड्या हा 'एनआयए'साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे, असा टोला शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातून (Saamna Editorial) लागवाण्यात आला आहे. सचिन वाझे (Sachin Vaze Case) प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परबमबीर सिंह (Param Bir Singh) यांची झालेली बदली, मनसुख हिरेन प्रकरण (Mansukh Hiren case), अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांबाबत एनआयए करत असलेला तपास आणि विरोधी पक्षाने घेतलेली आक्रमक भूमिका. या सगळ्यांवरुन शिवसेना मुखपत्र दैनिक सामनातून जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

काय म्हटले आहे सामना संपादकीयात?