Sachin Tapadia Heart Attack: उद्योगपती सचिन तापडिया यांचा बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू

सचिन तापडिया (Sachin Tapadia Heart Attack) असे या उद्योजकाचे नाव आहे. बॅडमिंटन (Badminton) खेळताना ते जागीच कोसळले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Heart Attack |

बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने परभणी (Parbhani) येथील प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू झाला आहे. सचिन तापडिया (Sachin Tapadia Heart Attack) असे या उद्योजकाचे नाव आहे. बॅडमिंटन (Badminton) खेळताना ते जागीच कोसळले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी (25 ऑगस्ट) घडली. पाठिमागील काही काळापासून हृदविकारांच्या झटक्याे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे समाजामध्येही चिंतेचे वातावरण आहे.

सचिन तापडिया यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. आकस्मिक मृत्यूमुळे या दोन मुलांच्या डोक्यावरचे पितृछत्र हरवले आहे. या घटनेमुळे परभणी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन तापडे यांची तापडिया ड्रायव्हिंग स्कूल ही परभणी येथील एक प्रसिद्ध ड्रायव्हिंग स्कूल आहे. यासोबतच फायनान्स आणि इतर उद्योगांमध्येही ते सक्रीय आहेत. (हेही वाचा, भारतीय तरुणांमध्ये वाढतोय Heart Attack चा धोका; जाणून घ्या काय आहेत तारुण्यपणी हृदयविकाराचा झटका येण्याची कारण)

परिसरातील नागरिकांनी सांगितले की, सचिन तापडिया हे चांगले बँडमिंटन खेळत असत. प्रकृतीबाबत ते अधिक सजग होते. त्यामुळे व्यायाम आणि खेळ याकडे त्यांचे चांगले लक्ष असे.तरीही त्यांना नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif