Saamana Editorial Today: सुपारीबाज कलावंंताच्या राज्यद्रोहास पाठिंंबा देणंं ही हरामखोरीच- शिवसेनेचा भाजप वर थेट हल्ला

बॉलिवूड अभिनेत्री कंंगना रनौत (Kangana Ranaut) हिने मुंंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केल्याने उसळलेला वाद अजुनही सुरुच आहे, आज याच वादावरुन शिवसेनेने (Shivsena) केंद्र सरकार व महाराष्ट्रातील विरोधी पक्ष भाजपवर (Maharashtra BJP) थेट हल्ला चढवला आहे

Saamana Editorial Slams BJP (Photo Credits: File Image)

बॉलिवूड अभिनेत्री कंंगना रनौत (Kangana Ranaut) हिने मुंंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केल्याने उसळलेला वाद अजुनही सुरुच आहे, आज याच वादावरुन शिवसेनेने (Shivsena) केंद्र सरकार व महाराष्ट्रातील विरोधी पक्ष भाजपवर (Maharashtra BJP) थेट हल्ला चढवला आहे. कंंगनाचा उल्लेख न करता, मुंंबई व महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांंचा अपमान करणार्‍या देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. अशा लोकांंना वाय सुरक्षेची पालखी देत भाजप सरळ पाठिंंबा दर्शवत आहे, केवळ राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी अशी वागणुक पाहता अशांना मुंंबईसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांंचा व राज्यातील 11 कोटी जनतेचा तळतळाट लागल्यावाचुन राहणार नाही अशा शब्दात आज सामनाच्या अग्रलेखातुन जहरी टीका करण्यात आली आहे. आजच्या सामना अग्रलेखातील काही महत्वाचे मुद्दे सविस्तर वाचा..

Kangana Ranaut Coronavirus Test: कंगना रनौत ची कोरोना चाचणी आली निगेटिव्ह; हिमाचल प्रदेशहुन मुंंबई साठी रवाना (See Photos)

मुंंबई कुणाची?

मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू नये. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाचे सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्रसुद्धा आहे. मुंबईसाठी 106  मराठी माणसांनी बलिदान दिले आहे. मुंंबई छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. किंंबहुना म्हणूनच ती हिंदुस्थानची आहे. मुंबई ही मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. अशा मुंबईची तुलना ‘पाकव्याप्त’ काश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया म्हणुन हिणवत खाकी वर्दीचा अवमान करणे, महाराष्ट्रावर नशेच्या पिचकाऱया टाकणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.   अशा व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेच्या पालखीचा मान देत आहे.

अहमदाबादचा अपमान झाला असता तर Y सुरक्षा दिली असती का?

मुंंबईचा अपमान हा राज्यातील  देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो,  हे मुंंबईला खिळखिळे करुन महाराष्ट्रापासुन तोडण्याचे प्रयत्न आहेत, पण याच जागी जर का अहमदाबाद, गुरगाव, लखनौ, वाराणसी, रांची, हैदराबाद या राज्यांंचा अपमान झाला असता तर तो करणार्‍यांंना केंद्र सरकारने Y सुरक्षेची पालखी दिली असती का? पंंतप्रधान म्हणुन मोदींंचा अवमान आम्ही सहन करणार नाहीच पण  देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री शहा यांचा ‘एकेरी’ नावाने उद्धार करणाऱ्या टिनपाट वृत्तवाहिनीच्या मालकास भाजपवाल्यांनी असा पाठिंबा दिला असता काय? असे उपरोधक सवाल सुद्धा आजच्या अग्रलेखातुन केलेला आहे.

भारत- चीन तणावावरही भाष्य

महाराष्ट्रातील सरकारच्या अधिकारावर आणि स्वातंत्र्यावर हल्ले करण्याची एकही संधी महाराष्ट्रातील भाजपवाले आणि केंद्र सरकार सोडत नाही. आज ज्या पद्धतीने हे समस्त भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत, तो ठामपणा आपल्या हद्दीत घुसलेल्या चिनी माकडांच्या बाबतीत दाखवला असता तर लडाख, अरुणाचलच्या सीमेवर देशाची बेइज्जती झाली नसती. देशाच्या इभ्रतीचे वाभाडे उघडपणे निघू नयेत म्हणून राष्ट्रभक्तांनी संयम बाळगला आहे इतकेच असे म्हणत अग्रलेखातुन भारत चीन तणावावरही भाष्य करण्यात आले आहे.

दरम्यान, कोणी ऐर्‍या गैर्‍याने यावंं आणि टपली मारुन जावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून आव्हानाची भाषा करावी या विरोधात संपूर्ण महाराष्ट्राने एकवटायला हवे अशा शब्दात शिवसेनेने महाराष्ट्र वासियांंना आवाहन केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now