पाकिस्तान अजून किती धोंडे पाडून घेणार - सामना च्या अग्रलेखातून इमरान खान च्या कश्मीर प्रश्नी घेतलेल्या भूमिकेची उडवली खिल्ली
त्यामुळे इमरान खान आणि पाकिस्तान आता पायावर किती धोंडे पाडून घेणार असा सवाल सामना या शिवसेना पक्षाच्या मुखपत्रातून विचारण्यात आला आहे.
भारताने काही दिवसांपूर्वी जम्मू कश्मीरमधून कलम 370 आणि 35 A हटवत कश्मीर आणि लद्दाख हे भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केले. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तान मध्येही प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली. भारताच्या या निर्णयावर आक्षेप घेत संयुक्त राष्ट्रामध्ये बंद पडद्याआड चर्चा झाली. मात्र त्याला पाकिस्तानला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अमेरिकेने फटकारल्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी कायम आहे. चीनच्या मदतीने संयुक्त राष्ट्रामध्ये सुरक्षा मंडळात अनौपचारिक चर्चेची मागणीही निष्फळ ठरली. त्यामुळे इमरान खान आणि पाकिस्तान आता पायावर किती धोंडे पाडून घेणार असा सवाल सामना या शिवसेना पक्षाच्या मुखपत्रातून विचारण्यात आला आहे.
पाकिस्तान देशासाठी नसती उठाठेव करून चीननेही आपलं तोंड पोळून घेतलं असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी इमरान खान यांनी अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीदेखील भेट घेतली होती. या भेटीदरम्यानही भारत-पाक संबंधांवर चर्चा झाली. मात्र यामध्ये अमेरिकेनेही हात वर केल्याने पाकिस्तानची सार्याच बाजूने कोंडी झाली आहे. पुलवामा येथील भारताच्या सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत-पाक संबंध अधिक ताणले गेले आहेत. तिहेरी तलाक आणि कलम 370 हटवण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे देशात समान नागरी कायदा आणण्याची नांदी : संजय राऊत
यंदा भारताच्या स्वातंत्र्यदिनी देखील सामन्याच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी सरकारच्या कश्मीर मधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचं कौतुक करण्यात आलं. यासोबतच भारतामध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू केला जाण्याची ही सुरूवात असल्याचंही म्हटलं होतं