Rupee Co-operative Bank Limited वर RBI च्या कारवाईमुळे 22 सप्टेंबर पासून बॅंकेला कायमचं टाळं!

ही पुणे स्थित बॅंक आहे. 22 सप्टेंबरला आता त्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत बॅंकिंग सर्व्हिस बंद होणार आहे.

RBI Action on Rupee Bank | (Photo Credit: Archived, edited, representative images)

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) कडून नियमांचं पालन न केल्याच्या कारणावरून रूपी को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड (Rupee Co-operative Bank Limited) वर कारवाई करण्यात आली आहे. आता रूपी बॅंकेला 22 सप्टेंबरपासून टाळं लावलं जाणार आहे. आरबीआय कडून कारवाईचा बडगा उचलण्यात आल्याने आता ग्राहकांच्याही अडचणी वाढल्या आहेत. मागील काही दिवसांपासून आरबीआय बॅंक आणि वित्तीय संस्थांवर कारवाई करत आहे.

आरबीआय ने ऑगस्ट महिन्यात रूपी को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड चं लायसन्स रद्द केले होते. ही पुणे स्थित बॅंक आहे. 22 सप्टेंबरला आता त्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत बॅंकिंग सर्व्हिस बंद होणार आहे. आरबीआय कडून जारी नोटिसी मध्ये बॅंकेची आर्थिक स्थिती नीट नसल्याचं सांगण्यात आले आहे.

रिझर्व्ह बॅंकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रूपी बॅंक 22 सप्टेंबर पासून आपलं काम बंद करणार आहे. यानंतर ग्राहक ना पैसे टाकू शकत, ना काढू शकत. तसेच कोणताही आर्थिक व्यवहार देखील केला जाऊ शकत नाही. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बॅंकेची आर्थिक स्थिती योग्य नाही भविष्यात ती सुधारण्याची शक्यताही नाही. त्यामुळेच या बॅंकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे.

ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

दरम्यान ज्या ग्राहकांचा पैसा या बॅंकेमध्ये आहे त्यांना आरबीआयच्या डिपॉजिट इंश्युरंस अ‍ॅन्ड क्रेडिट गॅरंटी कोऑपरेशन इंश्युरंस योजना अंतर्गत 5 लाख रूपयांचा इंश्युरंस कव्हर मिळणार आहे. या नियमानुसार जर बॅंक आर्थिक स्थितीतून डबघईला गेल्यास ग्राहकांना DICGC नुसार 5 लाखापर्यंतची रक्कम डिपॉझिट वर इंश्यूरन्स कव्हर म्हणून दिले जातात.