Ruckus on Air Vistara Flight Incident: Abu Dhabi-Mumbai विमानात इटालियन महिलेचा हैदोस; अर्धनग्न अवस्थेत येरझार्‍या घालत केबिन क्रू ला देखील मारहाण

ही महिला इकॉनॉमी क्लासचं तिकीट असताना बिझनेस क्लास मधून प्रवास करण्याचा हट्ट करत असल्याचा आरोप आहे.

Flight | Pixabay.com

मुंबई (Mumbai) मध्ये सहार पोलिसांनी (Sahar Police) 45 वर्षीय महिलेला अटक केली आहे. Paola Perruccio नामक महिला इटलीची आहे. सोमवारी (30 जानेवारी) एअर विस्ताराच्या (Air Vistara) अबुधाबी ते मुंबई विमानामध्ये (Abu Dhabi-Mumbai) तिने घातलेल्या गोंधळामुळे सारे जण हैराण झाले होते. ही महिला इकॉनॉमी क्लासचं तिकीट असताना बिझनेस क्लास मधून प्रवास करण्याचा हट्ट करत असल्याचा आरोप आहे. दरम्यान तिने काही केबिन क्रुला देखील त्रास देत हंगामा केला. काही वेळाने तिने स्वतःचेच काही कपडे काढून अर्धनग्न अवस्थेमध्ये ती विमानात फिरत होती.

Air Vistara flight UK 256 च्या केबिन क्रू कडून पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. अबुधाबी मधून सोमवारी IST वेळेनुसार सकाळी 2 वाजून 3 मिनिटांनी विमान टेक ऑफ झालं. दरम्यान पोलिसांनी तक्रारीमध्ये सांगितलेल्या हकिकतीनुसार, 2.30 च्या सुमारास इकॉनॉमी क्लास मधील महिला अचानक बिझनेस क्लासकडे धावली. केबिन क्रू मधून दोघांनी तिला काही मदत हवी का? याची विचारणा केली. नंतर त्या महिलेला पुन्हा आपल्या जागेवर बसण्यासाठी विनंती केली. मग ती अरेरावी करायला लागली. एका क्रु मेंबरला तिने चेहर्‍यावर बुक्का देखील मारला. अंगावरचे काही कपडे काढत ती विमानात अर्धनग्न अवस्थेमध्ये फिरत होती.

दरम्यान विमान जेव्हा मुंबई मध्ये Chhatrapati Shivaji Maharaj International Airport वर 4.53 च्या सुमारास उतरलं तेव्हा संबंधित प्रवासीला Air Vistara’s security officials कडे सुपूर्त करण्यात आलं. पोलिसांना प्राथमिक चौकशीमध्ये तिच्या पासपोर्ट वरून Perruccio ही इटलीची रहिवासी असून तिचा जन्म Sondrio या इटलीमधील शहरात झाला. नक्की वाचा: Air India Urination Case: एअर इंडिया विमानात महिलेवर लंघूशंका केल्याप्रकरणी कंपनीने आरोपी शंकर मिश्राच्या विमान प्रवासावर घातली पुढील 4 महिने बंदी .

मुंबईमध्ये उतरल्यावर Perruccio ला अटक झाली आणि नंतर जामीनावर तिची सुटका देखील झाली आहे.