पालघर मॉब लिंचिंग घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या- रामदास आठवले
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपली मत मांडत "या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या" अशी मागणी केली आहे.
पालघर मध्ये घडलेला मॉब लिचिंगचा प्रकार हा खूपच घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारा असल्याची टिका संपूर्ण महाराष्ट्रातून केली जात आहे. इतक्या क्रूरपणे 3 निरपराध लोकांचा जीव घेणा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. यावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपली मत मांडत "या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या" अशी मागणी केली आहे. झुंडबळीचा हा निर्घृण क्रूर प्रकार महाराष्ट्राची मान खाली घालणारा असून याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध रामदास आठवले यांनी केला आहे.
पालघरमधील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून तिघा व्यक्तींची जमावाने ठेचून निर्घृण हत्या केली. “धुळे जिल्ह्यात साक्रीतील राईनपाडा येथे असाच क्रूर प्रकार घडला होता. असे क्रूर प्रकार माणुसकीला काळिमा फासणारे असून ते रोखले पाहिजेत. त्यासाठी शासन आणि समाजाने ही दक्ष राहिले पाहिजे. अफवा पसरविणाऱ्यांना कठोर शिक्षा करून असे प्रकार रोखले पाहिजेत,” असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. पालघर घटनेतील सर्व आरोपींना अटक, गुन्हेगारांना शक्य तितकी कडक शिक्षा होईल: उद्धव ठाकरे
या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावर यांनीही आपले मत मांडत पालघरमधील घडलेली घटना आणि कोरोनाचा काहीही संबंध नसून कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र बनवलं जातयं असे फेसबुक लाईव्ह मध्ये बोलताना सांगितले. पालघर प्रकरणाच्या सखोल चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले असून विनाकारण या घटनेचे राजकारण करु नका असेही शरद पवार म्हणाले.
दरम्यान ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी 2 साधू, 1 ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल'', असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिले आहे.