Palghar News: अवघ्या पाच दिवसांच्या चिमुकलीची आईने केली हत्या, पालघर येथील घटना
तिसरी देखील मुलगी झाली त्यामुळे आईने अवघ्या पाच दिवसांच्या मुलीचा गळा घोटून जीव घेतला.
Palghar News: पालघर मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आईने अवघ्या पाच दिवसांच्या मुलीची हत्या केली आहे. तिसरी देखील मुलगी झाली त्यामुळे आईने अवघ्या पाच दिवसांच्या मुलीचा गळा घोटून जीव घेतला. पालघर मधील या घटनेमुळे मोठी खलबळ उडाली आहे. पालघर मधील तारापूर येथील पोलीसांनी आरोपीला अटक करण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया प्रभू असं आरोपीचे नाव आहे. या महिलेला आधीचे दोन आपत्य होते.
आरोपी महिला तीसऱ्यांदा गरोदर झाली. आणि तीसरी देखील मुलगी झाली. तीला मुलगा हवा असल्याने तीचं स्वप्न मोडलं त्यामुळ संतापलेल्या आईने पाच दिवसाच्या चिमुकलीचा गळा घोटळा यात तीचा गुदमरून जीव गेला. या धक्कादायक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. निर्दयी आईने मुलीचा मृतदेह नदीत फेकला. तीन दिवसांपूर्वी जन्म झालेल्या बाळाच्या तपासणीसाठी आशा सेविका आरोपी श्रेया प्रभू हिच्या घरी गेली असता आरोपीनं त्यांना उलट उत्तरं दिली. आणि उत्तर देण्यास देखील मनाई केली. मात्र, शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे चौकशी केली असता. शेजारच्यांनी महिला घराबाहेर आपल्या चिमुकल्या मुलीसह गेली, मात्र परतताना एकटीच घरी परतल्याचं कळालं. शेजाऱ्यांकडून माहिती मिळाली की, मुलीचे काही तरी केले असावे, आशा सेविकेचा संशय बळावला. यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, सदर घटनेची माहिती तारापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळा आरोपी अटक केली आणि तिला कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयानं क्रूर आईला पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2023 01:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

