Road Projects for Maharashtra: नितीन गडकरींची राज्याला मोठी भेट; 2100 कोटींच्या रस्ते प्रकल्पांना मंजुरी, जाणून घ्या मार्गांची नावे

याआधी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एका चर्चेला उत्तर देताना नितीन गडकरींनी, भारतामधील रस्त्यांचे जाळे आणि संबंधित पायाभूत सुविधा 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे करण्याचे केंद्र सरकारने केले असल्याचे सांगितले होते.

Road Projects for Maharashtra: नितीन गडकरींची राज्याला मोठी भेट; 2100 कोटींच्या रस्ते प्रकल्पांना मंजुरी, जाणून घ्या मार्गांची नावे
Union minister Nitin Gadkari (Photo Credits: IANS)

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मोठी भेट दिली आहे. त्यांनी महाराष्ट्राशी संबंधित 2100 कोटींपर्यंतचे रस्ते प्रकल्प मंजूर केले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. या मंजूर कामांमध्ये परभणी, नांदेड, गडचिरोली आणि बारामती या महामार्गांच्या कामांचा समावेश आहे. गडकरींनी एकामागून एक ट्विट करत कोणत्या रस्त्याच्या प्रकल्पासाठी किती कोटींचा निधी मंजूर झाला आहे, याची माहिती दिली आहे.

याआधी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एका चर्चेला उत्तर देताना नितीन गडकरींनी, भारतामधील रस्त्यांचे जाळे आणि संबंधित पायाभूत सुविधा 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे करण्याचे केंद्र सरकारने केले असल्याचे सांगितले होते.

आता महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या रस्ते कामांमध्ये,

महाराष्ट्रातील NH-752H च्या चिखली - दाभाडी - तळेगांव - पाल फाटा या 37.360 किमी रस्त्याचे 2-लेन तसेच 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी रु. 350.75 कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे. NH-161A च्या मुदखेड ते नांदेड विभागातील नांदेड - भोकर - हिमायतनगर - किनवट तसेच माहूर - अरणी रोड या रस्त्याचे 2-लेन तसेच 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी रु. 206.54 कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे.

ढवळी ते गडचिरोली रस्त्याच्या NH-930 वरील ढवळी ते राजोली, पांधसाळा ते मोहडोंगरी, आंबेशिवणी फाटा ते बोदली आणि मेड तुकुम ते गडचिरोली या 28 किमी लांबीच्या सध्याच्या महामार्गाचे 2L+PS/4 लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी रु. 316.44 कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यात सुरु झाली महिलांसाठी मोफत बससेवा; स्मार्ट कार्डद्वारे करू शकणार प्रवास)

NH-160 च्या उंडेवाडी कडे पठार ते देशमुख चौक व धवन पाटील चौक (बारामती) ते फलटण या 33.65 किमी रस्त्याचे 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी रु. 778.18 कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2022 11:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).