Sangali Accident: पोलिस भरतीच्या सरावासाठी जात असताना रस्ते अपघात, एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू,तीन गंभीर

सांगली येथे पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Accident (PC - File Photo)

Sangali Accident:  महाराष्ट्रातील सांगली  (Sangali) येथे मित्रांसोबत पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सकाळी तरुणांच्या दुचाकीला पिकअपने जोरदार धडक दिल्याने अपघात घडून आला आहे. अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात आणखी तीन तरुण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. ( हेही वाचा- नागपूरात फोटोग्राफरची भरदिवसा घरात घुसून गोळ्या झाडून हत्या)

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली येथील भोसे गावातील घटना आहे, पोलिस भरतीच्या सरावासाठी चार तरुण  दोन बाईकवरून भोसे येथील क्रीडा संकुल येथे पहाटे येत होते. दरम्यान रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कलंबीजवळ आले असता त्यांच्या बाईकला मागून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने जोरात धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की, अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

जखमी झालेल्या तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरीष अमसिध्ध खंबाळे  (वय वर्ष 21) असं मृत तरुणाचे नाव आहे. विश्वजीत विजय मोहिते (वय वर्ष 24), प्रथमेस उत्तम हराळे (वय वर्ष 24), प्रज्वल साळुंखे  (वय वर्ष 24) असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक घटनास्थळी आले आणि जखमींना तात्काळ शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif