डोंबिवली: डंपरच्या धडकेत कॅरमपटू जान्हवी मोरे हिचा अपघाती मृत्य; कल्याण शिळफाटा मार्गावरील पलावा सिटी सर्कल येथील घटना

यात ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईतल्या अनेक कॅरमपटूंचा समावेश होता. जान्हवीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मोरे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे. तर, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Carrom Star Janhavi More | (File Photo)

मूळची डोंबिवली (Dombivli) येथे राहणारी राज्यस्तरीय कॅरमपटू जान्हवी मोरे (Janhavi More) हिचा अपघाती मृत्यू झाला आहे. कल्याण (Kalyan)शिळफाटा (Shilphata)रस्त्यानजीक असलेल्या पलावा सिटी सर्कल येथे ही घटना घडली. रस्ता ओलांडताना जान्हवी मोरे हिला एका डंपरने धडक दिली. यात जान्हवी हिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१३ मे २०१९) रोजी घडली. जान्हवीच्या पार्थिवावर आज (१४ एप्रिल २०१९) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

जान्हवी ही उत्कृष्ठ कॅरमपटू म्हणून ओळखली जात असे. २०१५ मध्ये राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत तिने राज्य विजेतेपद मिळवले होते. तेव्हापासून कॅरम या क्रीडाप्रकारात तीच्या करीअरचा चढता आलेक सुरु होता. दरम्यान, ही धक्कादायक घटना घडली. सब ज्युनिअर आणि ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत जान्हवीने महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्त्वही केलं होतं. तर, महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमधल्या युवा गटात तेने कास्य पदक पटकावत लक्षवेधी कामगिरी केली होती. आता तीला सीनियर गटात खेळण्याचे वेध लागले होते. त्यासाठी तिने जोरदार तयारीही सुरु केली होती.(हेही वाचा, मुंबई : GST अधिकारी हरेंद्र कपाडीया यांची आत्महत्या, कफ परेड परिसरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतीच्या ३०व्या मजल्यावरुन घेतली उडी)

दरम्यान, जान्हवी मोरे हिला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातील कॅरमपटूंनी गर्दी केली होती. यात ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईतल्या अनेक कॅरमपटूंचा समावेश होता. जान्हवीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मोरे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे. तर, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif