Sushant Singh Rajput Case: पीएम नरेंद्र मोदी यांचा बायोपिक बनवणारा संदीप सिंह व भाजप यांच्यातील संबंधाबाबत चौकशीची विनंती; गृहमंत्री अनिल देशमुख पाठवणार CBI ला निवेदन
सीबीआय या प्रकरणाची चहुबाजूने चौकशी व तपासणी करत आहे. या चौकशीमध्ये दिवसागणिक नवे खुलासे होत आहे. आता या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला आहे.
सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूचे प्रकरण सध्या सीबीआयच्या (CBI) गोटात आहे. सीबीआय या प्रकरणाची चहुबाजूने चौकशी व तपासणी करत आहे. या चौकशीमध्ये दिवसागणिक नवे खुलासे होत आहे. आता या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला आहे. पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा बायोपिक बनवणारा व सुशांतला आपला जवळचा मित्र मानणारा संदीप सिंह (Sandeep Singh) आणि भाजप (BJP) यांच्यात नक्की काही संबंध आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. याबाबत अनेक लोकांनी आवाज उठवला होता. आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) हे भाजपा, बॉलीवुड, संदीप सिंह व ड्रग्स यांचे काय नाते आहे, ते शोधून काढण्याची विनंती सीबीआयला करणार आहेत.
याबाबत ते म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक बनवणारी व्यक्ती संदीप सिंह आणि भाजपा यांच्यातील संबंधांची चौकशी करण्यासाठी मला बर्याच विनंत्या व तक्रारी आल्या आहेत. आता बॉलिवूड आणि ड्रग्जशी त्यांच्या असलेल्या संबंधाबद्दल चौकशी करण्याची विनंती मी सीबीआयला करणार आहे.’
एएनआय ट्वीट -
चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर आता या प्रकरणात ड्रग्जच्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे. यातील ड्रग डीलिंगमध्ये संदीप सिंहचे नाव समोर आले आहे. आता चर्चेत आलेल्या संदीप सिंहबाबत महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर हल्ला चढविला आहे. संदीपचे भाजप नेत्यांशी सखोल संबंध असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. संदीप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मचरित्रावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाची निर्मिती केली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंह यांच्यासमवेत या चित्रपटाची पोस्टर्स प्रसिद्ध केली.
(हेही वाचा: सुशांंत सिंह राजपूत ने स्वतः एका मुलाखतीत Claustrophobia असल्याची दिली होती कबुली, पहा हा Viral Video)
संदीप सिंहने निर्मिती केलेला पंतप्रधान मोदी यांचा बायोपिक 27 भाषांमध्ये बनला होता. कॉंग्रेसचे नेते म्हणाले की, 'बॉलिवूडमधील इतर सुप्रसिद्ध निर्माते असून संदीप सिंह याचीच निवड का केली गेली?' ते पुढे म्हणाले, ‘भाजप, बॉलिवूड, संदीप सिंह आणि ड्रग्ज यांच्यात काय संबंध आहे याची मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे.’ आता याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख हे सीबीआयला निवेदन पाठवणार आहेत.