शनिवार वाड्याचं नाव बदलून 'पेशवे-होळकर वाडा' करा - माजी आमदार प्रकाश शेंडगे
धनगरांचा इतिहास तरुणपिढीपर्यंत पोहचायला हवा यासाठी शनिवारवाड्याचे नाव बदलण्यात यावे, असंही शेंडगे यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील (Pune) शनिवार वाड्याचं (Shaniwar Wada) नाव बदलून 'पेशवे-होळकर वाडा' करा, अशी मागणी (Demand) माजी आमदार प्रकाश शेंडगे (Former MLA Prakash Shandge) यांनी केली आहे. धनगरांचा इतिहास तरुणपिढीपर्यंत पोहचायला हवा यासाठी शनिवारवाड्याचे नाव बदलण्यात यावे, असंही शेंडगे यांनी म्हटलं आहे. मराठ्यांच्या इतिहासात दुसरे बाजीराव पेशवे आणि यशवंतराव होळकर यांच्यात हडपसर येथे युद्ध झाले होते. यात बाजीराव पेशव्यांचा पराभव झाला होतो. होळकरांनी या युद्धात एकहाती विजय मिळवला होता. या पराभवानंतर दुसरे बाजीराव पेशवे कोकणाकडे पळाले होते. हा इतिहास धनगर तरुणपिढीपर्यंत पोहचायला हवा, असंही शेंडगे म्हणाले. यासंदर्भात लोकमत वृत्तसंस्थेने वृत्त प्रकाशित केले आहे.
दुसरे बाजीराव पेशव्यांनी होळकर साम्राज्यावरील हक्क नाकारल्याने महाराजा यशवंतराव होळकर यांनी हडपसर येथे पेशव्याविरुद्ध 1802 मध्ये लढाई केली. यामध्ये पराभूत बाजीराव पेशव्यांनी पुण्यातून पळ काढला होता. तेव्हापासून त्यांना पळपुटे बाजीराव, असं संबोधण्यात आलं. तसचं लवकरचं हडपसर येथे यशवंतराव होळकर यांचा विजयस्तंभ उभारणार असल्याचंही शेंडगे यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - CAA हिंसाचाराविषयी मोठा खुलासा; दंगल घडवण्यासाठी 120 कोटींपेक्षा जास्त खर्च? इस्लामिक अतिरेकी संघटनेच हात असल्याचा संशय)
यशवंतराव होळकर यांचा जन्म वाफगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे सन 03 डिसेंबर 1776 रोजी झाला होता. ते होळकरशाहीचे पहिले महाराजा होते. बुडणाऱ्या मराठेशाहीला वाचवण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांना थोपवले होते. शनिवार वाड्याचं नाव बदलून 'पेशवे-होळकर वाडा' करा, या शेंडगे यांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.