Maratha Reservation: राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा; विनायक मेटे यांची मागणी
तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत राज्य सरकार झोपेचं सोंग करत आहे, असा आरोपदेखील विनायक मेटे यांनी लावला आहे.
Maratha Reservation: राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केली आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत राज्य सरकार झोपेचं सोंग करत आहे, असा आरोपदेखील विनायक मेटे यांनी लावला आहे.
यासंदर्भात अधिक बोलताना विनायक मेटे म्हणाले की, 'मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करत आहे. त्यामुळे सरकारला जागं करण्याची गरज आहे. त्यासाठी आंदोलन करावचं लागेल. राज्य सरकारने अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून हटवावे. चव्हाण यांच्या जागी एकनाथ शिंदे किंवा इतर सक्षम मंत्र्याची अध्यक्षपदी नियुक्त करावी, अशी स्पष्ट मागणीदेखील मेटे यांनी केली आहे. (हेही वाचा - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.सुभाष चौधरी यांची नियुक्ती)
दरम्यान, राज्यात सध्या विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मराठा समन्वय समितीची महत्वाची बैठक सुरु आहे. या समन्वय समितीत 10 ते 12 संघटनांचा सहभाग आहे. या बैठकीत मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न व आरक्षणासंदर्भात आंदोलनाविषयी चर्चा झाली. या समन्वय समितीने राज्य सरकार मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भात गंभीर नसल्याचं म्हटलं आहे.