Sangli Reliance Jewels Showroom वर सशस्त्र दरोडा, 14 कोटी रुपयांचे दागिने लंपास; दरोडेखोर बॅग विसरल्याने हिरे सलामत
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नाही की संशयीतही ताब्यात घेतला नाही. सांगली पोलिसांनी दरोड्याच्या तापासासाठी सात पथके तैनात करण्यात आली आहेत. दरोडेखोरांचा तपास करण्यासाठी इतर जिल्ह्यातील पोलिसांचीही मदत घेतली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
Reliance Jewels Showroom Robbery at Sangl: सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे सांगली शहर रविवारी (4 जून) हादरुन गेले. शहरातील रिलायन्स ज्वेल्स शोरूमवर दरोडेखरांनी दरोडा टाकला. या वेळी शोरुमधील 14 कोटी रकमेचे सुमारे 80% दागिने लूटण्यात आले. पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोडांची टोळी परराज्यातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरोडेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध दरोडा टाकल्याचे लक्षात येते. यात ज्वेलर्समधील मोठा ऐवज चोरुन नेण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे दरोडा टाकताना एक बॅग दरोडेखोर शोरुममध्येच विसरले. त्यामुळे या बॅगेतील कोट्यवधी रुपयांचे हिरे सहिसलामत राहिल्याचेही त्यांनी सांगितले.
दरोड्याची उकल करण्यासाठी सांगली पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नाही की संशयीतही ताब्यात घेतला नाही. सांगली पोलिसांनी दरोड्याच्या तापासासाठी सात पथके तैनात करण्यात आली आहेत. दरोडेखोरांचा तपास करण्यासाठी इतर जिल्ह्यातील पोलिसांचीही मदत घेतली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Jalgaon SBI Bank Robbery: जळगाव येथील एसबीआय बँकेत दरोडा; व्यवस्थापकावर कोयत्याने वार; रोख 17 लाख रुपये, तीन कोटींचे दागिने आणि CCTV DVR पळवला)
सांगली शहरातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या वसंत कॉलनी येथे रिलायन्स ज्वेल्स हे शोरुम आहे. पाठिमागील अनेक वर्षांपासून या भागात नारिकांना सवा देत असलेले हे शोरुम दरोडेखोरांच्या रडारवर आहे हे कोणाच्याही लक्षात आले नव्हते. काल दुपारी जेव्हा दरोडा पडला तेव्हा दुपारचे साधारण तीन ते साडेतीन वाजले होते. या वेळी शोरुममध्ये कर्मचारी वगळता कोणीही नव्हते. दुसऱ्या बाजूला मिरजेच्या दिशेने जात असलेला रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी बंद होता.
दरम्यान, दरोडेखोरांनी ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करुन सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र केले. आता आपण ज्वेलर्सची तपासणी करणार असल्याचे सांगितले. तसेच, सर्व कर्मचारी एकत्र येताच त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवला. त्यांचे हात बांधले आणि ज्वेलर्समधील दागिन्यांवर डल्ला मारला. दरम्यान, कर्मचाऱ्यांपैकी काहींनी आरोपींना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कर्मचाऱ्यांना आरोपींनी मारहाण केली. यातील दोन कर्मचाऱ्यांना बाजूला घेऊन आरोपींनी शोरुममधील दागिणे सोबतच्या बॅगेत भरण्यास सांगितले.
दरोडेखोरांनी चांदिचे दागिणे शोरुममध्येच ठेऊन केवळ सोन्याचे दागिणे, डायमड आणि रोख रक्कम सोबत घेतली आणि पोबारा केला. धक्कादाय म्हणजे आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेरे असलेला डीव्हीआरही ताब्यात घेतला. दरम्यान, घाईगडबडीमध्ये आरोपींच्या हातातून डीव्हीआर खाली पडला आणि तो फुटला. त्यामुळे तो डिव्हीआर तेथेच ठेऊन आरोपी निघून गेले. पोलिसांनी हा डीव्हीआर ताब्यात घेतला असून, तपास सुरु केला आहे.