Red Alert Declared in Pune: पुण्यात रेड अलर्ट जाहीर! मुंबई, रत्नागिरी आणि इतर जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट
मुंबई, रत्नागिरी आणि सातारा येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Red Alert Declared in Pune: उत्तर भारतात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे झुकला आहे. उत्तर पश्चिम बंगालचा उपसागर आणि ओडिशाच्या किनारपट्टीदरम्यान (Odisha Coast) कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढल्याने पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) हवामान अंदाजानुसार, 22, 23 आणि 24 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पावसाची नोंद होईल. गेल्या 24 तासात 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. (हेही वाचा - Mumbai Rainfall Update: मुंबईत पावसाची धुवाधार बॅटिंग; पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद, Watch Video)
पुणे, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सातारा येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे शहरातही या पावसाळ्यात आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक 24 तासांचा पाऊस झाला आहे. रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसला असून माथेरानमध्ये विलक्षण 400 मिमी पाऊस झाला आहे. हवामान तज्ञ विनीत कुमार सिंह यांनी TOI ला सांगितले की, गेल्या 24 तासांत, महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाली, जो हंगामातील सर्वाधिक आहे. ताम्हिणीमध्ये तब्बल 350 मिमी पावसाची नोंद झाली. कर्जतमध्ये 275 मिमी, आणि महाबळेश्वरमध्ये 315 मिमी पाऊस पडला. या दोन्ही ठिकाणी मोसमातील सर्वाधिक पाऊस झाला.