NCL Pune Recruitment 2022: पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत विविध रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू; 'असा' करा अर्ज
याशिवाय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे प्रकल्प सहयोगी पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
NCL Pune Recruitment 2022: पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत प्रोजेक्ट असोसिएट, प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट, प्रकल्प वैज्ञानिक-I पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पदांनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 4, 5, 9, & 12 सप्टेंबर 2022 अशी आहे.
याशिवाय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे प्रकल्प सहयोगी पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे. (हेही वाचा - SBI Clerk Recruitment 2022: बँकींग क्षेत्रात नोकरीची संधी, एसबीआयमध्ये नोकर भरती; जाणून घ्या पदसंख्या, पात्रता आणि अर्ज करण्याची मूदत)
पदाचे नाव – प्रोजेक्ट असोसिएट, प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट; प्रकल्प वैज्ञानिक-I
पद संख्या – 14 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4, 5, 9, & 12 सप्टेंबर 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट – www.ncl-india.org
'असा' करा अर्ज -
पात्र उमेदवारांनी केवळ www.ncl-india.org वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. नोकरीच्या रिक्त जागा या विभागातून तपशील www.ncl-india.org वेबसाईट वर जाहीर केलेल्या आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराकडे वैध ईमेल असणे आवश्यक आहे.