MHADA Recruitment 2021: म्हाडामध्ये 535 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू, 'असा' करा अर्ज

म्हाडामध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (आर्किटेक्चर), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ पदासाठी अधिसूचना जारी करण्याची अपेक्षा आहे.

mhada (pic credit - mhada twitter )

MHADA Jobs 2021: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) ने मुंबई लवकरच 535 पदासांठी भरती (Recruitment) करण्यात येणार आहे. म्हाडामध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ पदासाठी अधिसूचना जारी करण्याची अपेक्षा आहे. अभियंता, कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक, आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक लेखक, सर्वेक्षक आणि ट्रेसर पदे रिक्त आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी  mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. अहवालानुसार म्हाडा ऑनलाईन अर्ज उद्यापासून म्हणजेच 17 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल नोंदणीची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे. हेही वाचा Gujarat CM Bhupendra Patel Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात विजय रुपाणी सरकारमधील मंत्र्यांना डच्चू; 8 पटेल, 6 OBC यांच्यासह 24 मंत्र्यांनी घेतली शपथ

उमेदवारांना सविस्तर सूचना आणि इतर अद्यतनांसाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या पदांच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं संबंधित विषयांमध्ये शिक्षण आणि अनुभव पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल.