Cold Weather in Mumbai: मुंबई शहरात विक्रमी थंडी, तापमान 16 अंशांवर, पुढचे तीन ते चार दिवस गारवा कायम राहणार- हवामान विभाग

या वेळी नेहमीच्या तुलनेत थंडीचा कडाका काहीसा अधिकच असून, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सहीरी पाहायला मिळत आहेत. हवामानातील बदलाचे परीणाम मुंबई शहरात (Cold Weather in Mumbai) पाहायला मिळत असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.

Cold Weather in Mumbai | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

राज्याची राजधानी मुंबई शहरात थंडीची लाट ( Cold Wave) कायम आहे. या वेळी नेहमीच्या तुलनेत थंडीचा कडाका काहीसा अधिकच असून, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सहीरी पाहायला मिळत आहेत. हवामानातील बदलाचे परीणाम मुंबई शहरात (Cold Weather in Mumbai) पाहायला मिळत असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. प्रामुख्याने मुंबईतील अनेक भागात किमान तापमान 16 अंशांवर पोहोचले आहे. आतापर्यंतचा तापमानाचा हा विक्रमी निचांक असल्याचे म्हटले आहे. येत्या एक ते दोन दिवस मुंबईत थंडीचा प्रभाव कायम राहणार (Weather Forecast) असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांवर पांढरा थरही पाहायला मिळाला. एका बाजूला पावसाच्या हलक्या सरी आणि दुसऱ्या बाजूला थंडीची लाट असे विचित्री चित्रही मुंबईकरांना पाहायला मिळाले. रविवारी मुंबईतील दृश्यमानताही मोठ्या प्रमाणावर घटली होती. हवामान विभागाने याबाबत जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार, सांताक्रुझ येथील वेधशाळेत 23.8 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. पाठिमागील 10 वर्षांतील हे सर्वात निचांकी तापमान आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Update: राज्यात तापमान वाढले तरी गारठा कायम; खान्देश, विदर्भात हवामान विभागाकडून गारपीठीची शक्यता)

मुंबईत नोंदवले गेलेले तापमान (कुलाबा आणि सांताक्रुझ येथील वेधशाळा)

कुलाबा

24 अंश सेल्सिअस

सांताक्रुझ

23.8 अंश

ट्विट

भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, वातावरणातील बदलामुळे देशातील ऋतुमानतेमध्येही बदल पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने बलुचिस्तानातून वारे भारतात येत आहे. या वाऱ्यामुळे मुंबई आणि पुण्यामध्ये पांढरी धूळ पाहायला मिळत आहे. सौराष्ट्र, मुंबई आणि कोकण आधी ठिकाणीही वाहनांवर आणि वातावरणात पांढरी पावडर पाहायला मिळते आहे.