Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg महाराष्ट्र साठी 'गेम चेंजर' म्हणून का संबोधला जातोय? जाणून घ्या या महामार्गाची वैशिष्ट्यं!

नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केवळ आज पार पडलं आहे.

समृद्धी महामार्ग । PC: Twitter DD News and Devendra Fadnavis

महाराष्ट्रासाठी ड्र्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) चा पहिला टप्पा आज (11 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते खुला करण्यात आला आहे. मुंबई-नागपूर असा हा एक्सप्रेस वे (Mumbai Nagpur Express Way) अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी बनला आहे. त्यामुळेच बहुप्रतिक्षित या महामार्गाकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. हा महामार्ग केवळ महाराष्ट्राच्या आर्थिक आणि उपराजधानीला जोडणारा महामार्ग नव्हे तर महाराष्ट्रातील 10 जिल्ह्ंयातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जाणार असल्याने खास बनला आहे. म्हणून जाणून घ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ची नेमकी खास वैशिष्ट्यं काय आहेत?

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ची खास आकर्षण

701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केवळ आज पार पडलं आहे.