RBI ने 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवले PMC बॅंकेवरील निर्बंध
RBI कडून काल (25 जून) पंजाब अॅन्ड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बॅंक (PMC Bank) वर घालण्यात आलेले निर्बंध आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) कडून काल (25 जून) पंजाब अॅन्ड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बॅंक (PMC Bank) वर घालण्यात आलेले निर्बंध आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. दरम्यान सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेसला सहकारी बँक खरेदी प्रक्रिया पार पाडता यावी यासाठी रिझव्र्ह बँकेने ‘पीएमसी बँके’वरील निर्बंध सहा महिन्यांसाठी वाढवले आहेत. पूर्वी याची मुदत 30 जून 2021 पर्यंतच होती पण आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
आरबीआय ने नुकतेच Centrum Group ला पीएमसीला समाविष्ट करून घेण्यासाठी स्मॉल फायनान्स बॅंक सुरू करण्याला परवानगी दिली आहे. सध्या मार्च 2021 च्या शेवटापर्यंत सहकारी बॅकेमधील ठेवींची रक्कम 10,727 कोटी, कर्ज वितरण 4,472 कोटी तर मालमत्ता 3,518 कोटी असल्याची अंदाजे माहिती आहे. पीएमसी बॅंक अडचणीत आल्याने ग्राहकांना सुरूवातीला पैसे कढण्यावर निर्बंध होती. अगदी सुरूवातील अवघ्या हजार रूपयांची परवानगी होती तर आता ती लाखाभरापर्यंत वाढवण्यात आली आहे.
पीएमसी बॅंक घोटाळ्यात एचडीआयएल वर कारवाई करण्यात आली त्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर खातेदारकांच्या सुरक्षेसाठी पीएमसी बॅंकेचे व्यवहार 23 सप्टेंबर 2019 पासून स्थगित करण्यात आले आहेत.